

पुण्यातील मनोरुग्णालयात तरुणाची आत्महत्या
येरवडा मनोरुग्णालयातील धक्कादायक घटना
नैराश्यात गेलेल्या तरुणाने संपवलं आयुष्य
बारामतीच्या तरुणाचा पुण्यात मृत्यू
पुण्यामध्ये रुग्णाने रग्णालयात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. पुण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचार घेत असलेल्या तरुणाने गळफास घेऊन आयुष्य संपवलं. या आत्महत्येच्या घटनामुळे रुग्णालयात एकच खळबळ उडाली. सनी सोनवणे (२९ वर्षे) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो मूळचा बारामतीचा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मिशी वाढण्यासाठी केमिकल लावल्यानंतर त्याची मिशी गळून पडली होती. या घटनेमुळे तो प्रचंड नैराश्यात गेला होता. त्यानंतर त्याच्यावर हायपर सायकोसिस या आजारावर उपचार सुरू होते. २ दिवसांपूर्वी त्याला येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याठिकाणी आल्यापासून तो आणखी नैराश्येत गेला होता.
सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास रुग्णालयातील कर्मचारी चहा-नाश्ता देण्यासाठी गेले असता सनीने आत्महत्ये केलेल उघडकीस आले. सनीने खिडकीला पायजमा अडकवून गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने तातडीने पोलिसांना माहिती दिली. या घटनेमुळे रुग्णालयात एकच गोंधळ उडाला.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी ससून सर्वोपचार रुग्णालयात पाठवला आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे. त्याच्या मृतदेहावर बारामती येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. मनो रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. श्रीनिवास कोलोड यांनी ही माहिती दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.