Pune Kukri Gang : पुण्यात कोयत्यानंतर 'कुकरी' गँगची एन्ट्री, दिवसाढवळ्या तरुणाची हत्या; धक्कादायक कारण समोर

Pune Kukri Gang News : पुण्यात कोयत्यानंतर 'कुकरी' गँगची एन्ट्री झाली आहे. या गँगने दिवसाढवळ्या तरुणाची हत्या केली. तरुणाच्या हत्येचं धक्कादायक कारण समोर आलं आहे.
Pune Kukri Gang news
Pune Kukri GangSaam tv
Published On
Summary

पुण्यातील बाजीराव रोडवर दिवसाढवळ्या मयंक खरारे याची हत्या

आरोपी कुकरी टोळीशी संबंधित

दुचाकीवरून आलेल्या २–३ तरुणांकडून कोयता आणि कुकरीने हल्ला

पोलिसांचं पथक आरोपींना पकडण्यासाठी रवाना

अक्षय बडवे, साम टीव्ही

पुण्यात दिवसाढवळ्या तरुणाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील बाजीराव रोडवर तरुणाची तिघांनी भरदिवसा हत्या केली. मयंक खरारे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. पूर्व वैमनस्यातून मयंकची हत्या झाल्याचे समोर आलं आहे. मयंकची कोयता आणि कुकरी या शस्त्राने हत्या केली.

पुण्यातील बाजीराव रोड हत्या प्रकरणातील आरोपींचे नावे समोर आले आहेत. बाजीराव रोड हत्या प्रकरण पूर्व वैमनस्यातून घडल्याचं समोर आलंय. पुण्यातील नव्याने उदयास येणाऱ्या माया टोळीचे हे कृत्य आहे. अभिजीत पाटील उर्फ माया, अमन उस्मान शिवलकर आणि अक्षय मारुती पाटोळे असे या आरोपींचे नाव आहेत.

Pune Kukri Gang news
Kalyan : कल्याणमध्ये चाललंय काय? स्कायवॉकवर वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांकडून व्यक्तीला बेदम मारहाण

नेमकं काय घडलं?

पुण्यातील बाजीराव रोड परिसरात आज दुपारी ३.१५ वाजता घटना घडली. एका तरुणावर एका दुचाकीवरून आलेले २ ते ३ जणांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू झाला. पूर्व वैमनस्यातूनच घटना घडल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

एका दुचाकीवरून आलेल्या दोन ते तीन तरुणांनी कोयता आणि कुकरी या हत्याराने एकावर हल्ला केला. या जीवघेण्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. आरोपींना पकडण्यासाठी पथकं रवाना करण्यात आली असल्याची माहिती पोलिस उपआयुक्त कृषिकेश रावले यांनी दिली आहे.

Pune Kukri Gang news
Election Commission PC Live : धुरळा उडाला! नगरपालिका-नगरपंचायतींसाठी २ डिसेंबरला मतदान, ३ डिसेंबरला निकाल, असा आहे संपूर्ण निवडणूक कार्यक्रम

पुण्यातील हत्याकांडवर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

सुप्रिया सुळे यांनी म्हटलं की, पुण्यातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती अतिशय गंभीर आहे. गेल्या तीन दिवसांत दोन खून झाले आहेत. कोंढवा येथील खूनाची घटना ताजी असतानाच आता बाजीराव रस्ता या मध्यवर्ती भागात एका तरुणाचा खून झाला. या घटनांमुळे सर्वसामान्य नागरीक भीतीच्या छायेखाली वावरत आहे.पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गृहखात्याने प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे. माझी राज्याच्या गृहमंत्री महोदयांना विनंती आहे की कृपया आपण शहरांतील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी कठोर कारवाई करावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com