पुण्यात अनैतिक संबंधामुळे घडला रक्तरंजित थरार; मुलाने आईच्या बॉयफ्रेंडला निर्घृणपणे संपवलं

pune shocking : पुण्यात अनैतिक संबंधामुळे हादरवणारं हत्याकांड घडलं आहे. संतापलेल्या मुलाने आईच्या बॉयफ्रेंडला संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
pune shocking
pune news Saam tv
Published On
Summary

पुण्यातील कात्रज आंबेगावात घडली धक्कादायक घटना

आईच्या बॉयफ्रेंडला मुलाने संपवलं

कात्रजच्या आंबेगावात घडला रक्तरंजित थरार

सचिन जाधव, साम टीव्ही

पुण्यातून हादरवणारं हत्याकांड उघडकीस आलं आहे. पुण्यातील मुलगा आईच्या अनैतिक संबंधाला संतापला. त्यानंतर संतापलेल्या या मुलाने आईच्या बॉयफ्रेंडची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पुण्यातील कात्रज आंबेगावात हे हादरवणारं प्रकरण घडलं. कात्रजच्या आंबेगाव इंद्रायणीनगरमध्ये परिसरात रविवारी रात्री घडलेल्या धक्कादायक हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरलाय.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कात्रज आंबेगावात राहणाऱ्या महिलेचे ३७ वर्षीय दीपक क्षीरसागरशी अनैतिक संबंध होते. दीपकच्या अनैतिक संबंधाची माहिती मुलाला समजली. मुलाची आई ही विवाहित होती. त्यानंतरही मुलाच्या आईचे दीपकशी कथित संबंध होते. या दोघांच्या संबंधांना महिलेच्या मुलाचा तीव्र विरोध होता.याच कारणावरून गेल्या काही दिवसांपासून आई आणि मुलामध्ये वाद सुरू असल्याचे समोर आले आहे.

pune shocking
Virar Crime: भरदिवसा RTI कार्यकर्त्याची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; विरार हादरलं!

रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास दोघांमध्ये हा वाद विकोपाला गेला. त्यानंतर संतप्त झालेल्या महिलेच्या मुलाने साथीदारासह दीपकला गाठलं. त्यानंतर मुलाने दीपकवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दीपकचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच आंबेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने पंचनामा केला. पोलिसांनी घटनास्थळाच्या आजूबाजूच्या लोकांची चौकशी केली. त्यांनी घटनास्थळावरून संशयित सिद्धार्थ हातुरे आणि अनिकेत हातुरे या दोघांना ताब्यात घेतलं.

पोलिसांकडून दोघांची कसून चौकशी सुरू आहे. हत्येमागील नेमके कारण,वापरण्यात आलेले शस्त्र आणि इतर कोणाचा सहभाग आहे का याचा तपास केला जात आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणात तपासानंतर आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास आंबेगाव पोलिस करत आहेत.

pune shocking
Pune Crime: पुणे हादरले! आईच्या बॉयफ्रेंडची हत्या, मुलीच्या प्रियकराने डोक्यात दगड घालून जागीच संपवलं

पुण्यात आईच्या प्रियकराचा मुलीच्या प्रियकराकडून खून

प्रेमसंबंध तोडण्यासाठी आईच्या प्रियकराने दबाव टाकल्याने तरुणीचा बॉयफ्रेंड संतापला. या रागातून तरुणीच्या बॉयफ्रेंडने आईच्या प्रियकराची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. पुण्यातील हडपसरमधील काळेपडळ परिसरात संपूर्ण ही घटना घडली.हत्या केल्या प्रकरणी तरुणीच्या प्रियकरासह साथीदारांना काळेपडळ पोलिसांनी अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com