

मनोरुग्णांच्या नातेवाईकांकडून धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
साम टीव्हीने बातमी दाखवताच आरोग्य उपसंचालक मनोरुग्णालयात पाहण्यासाठी दाखल
या प्रकरणातील दोषींवर कारवाई केली जाणार
पुण्यातील महाराष्ट्र शासनाच्या येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात अस्वच्छता, घाण व दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. रुग्णांना योग्य सोयीसुविधा मिळण्याऐवजी कर्मचाऱ्यांच्या कामचुकारीमुळे रुग्णांकडूनच कामे करून घेतली जात आहेत. टॉयलेट स्वच्छ करून घेणे, मैला स्वच्छ करून घेणे अशी कामे मनोरंगाकडून करून घेतली जात आहेत. एवढेच नव्हे तर कपडे ढकल गाडीतून वाहून नेणे, जेवण वाहून नेणे अशी कामे रुग्णांकडून करून घेतली जात आहेत. कर्मचारी मात्र फुकट शासनाचा पगार लाटत आहेत. ही बातमी साम टीव्ही दाखवल्यानंतर आरोग्य उपसंचालक प्रादेशिक म्हणून रुग्णालयात पाहण्यासाठी दाखल झाले.
रुग्ण काम करत असलेले व्हिडीओ समोर आल्याने मनोरुग्णालयातील वास्तव समोर आले आहे. आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर या गंभीर प्रकरणाची दखल घेणार का असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते हा व्हिडिओ बघून उपस्थित करत आहेत. या गंभीर प्रकारामुळे मनोरुग्णांची प्रचंड हेळसांड होत आहे. त्यामुळे मानसिक आजारातून बरे होणे तर दूर, पण हे मनोरुग्ण समस्यांच्या गर्ततेत अडकत असल्याचे विदारक चित्र या रुग्णालयास भेट दिली असता समोर येते. याबाबत महाराष्ट्र शासन अथवा आरोग्य विभागाने सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.
येरवडा प्रादेशिक रुग्णालयात राज्यभरातून आलेले मनोरुग्ण उपचार घेण्यासाठी दाखल होतात. या रुग्णालयातील १५ वार्डात सध्या सुमारे ९२० मनोरुग्ण उपचार घेत आहेत.रुग्ण असलेल्या वार्डच्या आजूबाजूची पहाणी केली असता भयाण वास्तव्य समोर आले. वार्डच्या आजूबाजूला घाण, दुर्गंधी, वाढलेले जंगल, दारूच्या बाटल्या पडल्याचे दिसत होते.
या वार्डातील रुग्णांना जेवण आणण्याचे काम लावले होते. मनोरुग्ण अस्वच्छ तर होतेच पण त्यांच्या अंगावरील कपडे (युनिफॉर्म) स्वच्छ व नीटनेटके नव्हते. मनोरुग्ण कक्षातील बेड, बेडशीट फ्लोअर वरील फरशी, बाथरूम अस्वच्छ होते. वॉर्डांतून उग्र वास येत होता. ड्रेनेज लाईन तुंबून वॉर्डच्या बाजूला पाणी साचून होते. खिडकीच्या काचा फुटल्याचे दिसून आले. नवीन रुग्णांना वेळेवर दाखल करून घेतले जात नाही.
एक एप्रिलपासून संबंधित ठेकेदाराने बिल न मिळाल्याच्या कारणावरून काम बंद केले होते. ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांकडून रुग्णांकडून काम करून घेण्यात आले. मनोरुग्णालयातील कर्मचारी व अधिकारी यांच्याकडून कुठलेही काम करवून घेतले नाही, असे स्पष्टीकरण प्रादेशिक मनोरुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
डॉ.श्रीनिवास कोलोड म्हणाले, आपण याआधीही कामात अनियमितता करणाऱ्या संबंधित ठेकेदार विजय कांबळे यांचे लोकराज्य संस्थेचे ३५ कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे. समाज माध्यमात व्हिडिओ व्हायरल केल्या संदर्भात संबंधित ठेकेदारावर फौजदारी कारवाई करण्यात येईल. मनोरुग्णांना कामाला लावणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल'.
या संदर्भात चौकशी समिती नेमण्यात आली असून याचा अहवाल येथे काही कालावधीत राज्य सरकारकडे पाठवण्यात येईल. संबंधित ठेकेदाराला काळे आधी टाकण्याची शिफारस राज्य सरकारकडे केली आहे. आपण अधीक्षकपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर कामकाजात अनेक सुधारणा करण्याचा प्रयत्न करत असून यासाठी सर्वाचे सहकार्य आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.