बैलगाडा शर्यतीतील खुन्नस! पुण्यात रागाच्या भरात 'थार'ने उडवलं

Thar Hits Two Wheeler Over Bullock Cart Race Dispute In Pune: पुण्याच्या सणसवाडीत बैलगाडा शर्यतीतील वादातून एका 'थार' गाडीने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले असून शिक्रापूर पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
The Shikrapur police have registered a case against two individuals after a Mahindra Thar allegedly rammed into a two-wheeler in Sanaswadi due to a dispute over a bullock cart race.
The Shikrapur police have registered a case against two individuals after a Mahindra Thar allegedly rammed into a two-wheeler in Sanaswadi due to a dispute over a bullock cart race.saam tv
Published On

सागर आव्हाड, साम टीव्ही

पुणे/शिक्रापूर: बैलगाडा शर्यतीतील वादातून सणसवाडी (ता. शिरूर) येथे थार वाहनाने दुचाकीला धडक देऊन दोघांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी चेतन गणपत हरगुडे (वय २७, रा. गव्हाळे वस्ती, सणसवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून संतोष मोडक आणि प्रज्वल मोडक (दोघे रा. वडकी, ता. हवेली) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०९ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चेतन हरगुडे हे जॉन डिअर कंपनीमध्ये नोकरी करतात. त्यांच्याकडे बैलगाडा शर्यतीसाठी बैल असून ते मामा महेंद्र कुटे यांच्यासह त्यांचा सांभाळ करतात. फिर्यादीनुसार, १० जुलै रोजी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील ६१ फाटा (देशमुख पट्टा) येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यती दरम्यान संतोष मोडक यांनी हरगुडे यांच्या बैलांबाबत स्टेजवरून आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा प्रकार युट्यूबवरील थेट प्रक्षेपणात पाहिल्यानंतर हरगुडे यांनी संतोष मोडक यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून विचारणा केली. त्यावेळी शिवीगाळ आणि दमदाटी करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

The Shikrapur police have registered a case against two individuals after a Mahindra Thar allegedly rammed into a two-wheeler in Sanaswadi due to a dispute over a bullock cart race.
Local Train Update : नालासोपारा-वसईत ट्रॅकवर पाणी साचण्याची कटकट संपणार, रेल्वेने घेतला 'हा' मोठा निर्णय

दुसऱ्या दिवशी सकाळी संतोष मोडक यांनी पुन्हा फोन करून शिवीगाळ आणि मारहाणीची धमकी दिल्याचा आरोपही फिर्यादीने केला आहे. १२ जुलै रोजी हरगुडे यांच्या आजोबांचे निधन झाल्याने ते घरी होते. त्यावेळी विनानोंदणी क्रमांकाची काळ्या रंगाची महिंद्रा थार घरासमोर वारंवार ये-जा करत असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर दुपारी सुमारे २.२० वाजता महेंद्र कुटे यांना कॉन्फरन्स कॉलवर संतोष मोडक यांनी चेतन हरगुडे यांना घराबाहेर जाऊ न देण्यास सांगितल्याचाही फिर्यादीत उल्लेख आहे.

The Shikrapur police have registered a case against two individuals after a Mahindra Thar allegedly rammed into a two-wheeler in Sanaswadi due to a dispute over a bullock cart race.
Jejuri Accident: विठूरायाच्या भक्तीत तल्लीन, अचानक ट्रकने वारकऱ्यांना चिरडलं; जेजुरी अपघाताचा थरकाप उडवणारा VIDEO समोर

दुपारी सुमारे २.२५ वाजता चेतन हरगुडे हे त्यांचा चुलत भाऊ अथर्व नवनाथ हरगुडे याच्यासह ॲक्टिव्हा दुचाकीवरून मेडिकलमधून औषधे घेऊन घरी परतत असताना सणसवाडी येथील डोंगरवस्ती चौकात समोरून आलेल्या विनानोंदणी क्रमांकाच्या महिंद्रा थारने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या अपघातात चेतन हरगुडे व अथर्व हरगुडे हे गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी त्यांना उपचारासाठी प्रथम जवळच्या रुग्णालयात, त्यानंतर वाघोली येथील लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, बैलगाडा शर्यतीतील वादातून हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला असून शिक्रापूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com