

'MH 12' आरटीओ कोड कायम राहणार आहे.
सध्या सुरू असलेली 'MH 12 ZZ' मालिका संपल्यानंतर पुण्यासाठी नवीन वाहन नोंदणी सिरीज सुरू होणार
खासदार मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली.
पुण्यातील वाहनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. वाहनांच्या नंबर प्लेटवरील 'MH 12' आरटीओ कोड नंबर राहणार की नाही बाबत नवीन अपडेट समोर आलीय. 'MH 12' हा आरटीओ (RTO) कोड यापुढेही कायम राहणार आहे. सध्या पुण्यातील वाहनांच्या नोंदणीसाठी 'MH 12 ZZ' ही शेवटची मालिका सुरू असून, ही मालिका संपल्यानंतर पुण्यासाठी कोणती नवीन मालिका सुरू करायची, असा प्रश्न निर्माण झाला होता.
यावर केंद्रीय राज्यमंत्री तथा पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन सकारात्मक तोडगा काढलाय असं सांगण्यात येत आहेत.
पुण्यातील वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. 'MH 12 ZZ' नंतर पुढील नोंदणीसाठी पुणे आरटीओला 'MH 61' ही नवीन सिरीज दिली जाण्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, 'MH 12' ही केवळ एक वाहनांची मालिका नसून ती पुण्याची एक खास ओळख बनलीय. त्यामुळे ही ओळख बदलू नये, अशी पुणेकरांची भावना होती. या विषयाचे गांभीर्य ओळखून मुरलीधर मोहोळ यांनी नितीन गडकरी यांची नवी दिल्लीत भेट घेतली.
पुण्याची हीच ओळख कायम ठेवण्यासाठी देशात पहिल्यांदाच 'एक अंक आणि एक अक्षर' (One Number and One Letter) म्हणजेच 'MH 12 1A' अशा स्वरूपाची नवीन मालिका सुरू करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलाय. मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, 'MH 12' हा कोड कायम ठेवण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या जातील, अशी ग्वाहीही त्यांनी दिलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.