Pune News: पुण्यात कायदा सुव्यवस्थेवर लघुशंका, सांस्कृतिक पुण्याचं श्रीमंताकडून हिट अँण्ड रन, पुण्यात बड्या बापाच्या पोराचा नंगा नाच

Pune crime: महिला दिनीच पुण्यात बड्या बापाच्या पोराचा नंगानाच समोर आलाय... नेमकं या बड्या बापाच्या पोराने सांस्कृतिक पुण्यात कोणतं लाजिरवाणं कृत्य केलं? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Pune crime
Pune crimeSaam Tv
Published On

ही दृष्य लाज आणणारी आहेत. त्यामुळे आम्ही आपल्याला ही दृष्य स्पष्ट दाखवू शकत नाही. मात्र राज्याची सांस्कृतिक नगरी ऐतिहासिक पुण्याची खुल्लमखुल्ला बदनामी कऱणाऱ्या या विकृताचं थोबाड आम्ही आपल्याला दाखवत आहोत. त्यामुळे काळे कपडे घालून भरदिवसा भररस्त्यात काळे कारनामे करणाऱ्या या बड्या बापाच्या कारट्याला नीट पाहा. हा जर तुम्हाला कुठे दिसला तर ताबडतोब 100 नंबर वर फोन करुन पोलिसांना कळवा. यानं फक्त सार्वजनिक ठिकाणी अश्लिल अश्लाघ्य कृत्य केलेलं नाही तर त्यानं आपल्या ऐतिहासिक पुण्याचं पावित्र्य नष्ट करण्याचं पाप केलंय.

एका सजग नागरिकांनं धाडसानं काढलेला हा व्हिडीओ पुन्हा एकदा पाहा...

गौरव औहुजा या माथेफिरु श्रीमंत बापाच्या माजोरड्यानं दारु पिऊन महागडी बीएमडब्लू चालवली. यावेळी शास्त्रीनगरच्या चौकात भररस्त्यात गाडी थांबवून सिग्नलवर लघुशंका केली. यावेळी त्याला रोखणाऱ्या सजग नागरिकांसोबत या बड्या बापाच्या माथेफिरू लेकानं अतिशय हिणकस प्रकार केला. मद्यधुंद अवस्थेतील हा गौरव आहुजा आपल्या आजूबाजूला महिला आहेत हे ही विसरला. आणि गाडी पळवत निघून गेला.

Pune crime
Santosh Deshmukh : हॉटेलमधला घास, आवळणार फास, 'असा' रचला देशमुखांच्या हत्येचा कट? गोपनीय साक्षीदारांचा धक्कादायक जबाब

यानंतर गौरव आहुजाच्या बापानं इमोशनल ड्रामा करत प्रतिक्रीया दिली आणि माझ्या मुलानं माझ्या तोंडावर लघुशंका केली असं म्हणत सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र या गौरव आहुजाच्या परिवाराची पार्श्वभूमी ही देखिल वादग्रस्त आहे.

Pune crime
Maharashtra Politics: जयंत पाटील यांच्या सूचक विधानाने भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण, नेमके काय म्हणाले?

- आरोपी गौरव आणि त्याचे वडील मनोज आहुजावर क्रिकेट बेटिंगचा आणि खंडणीचे गुन्हे दाखल

- या आधी दोघांना जेलवारी झाल्याची माहिती समोर

- लॉटरी हा आहुजा परिवाराचा पिढीजात व्यवसाय, सध्या हॉटेलचा व्यवसाय

- क्रिकेट बेटिंगच्या अवैध व्यवसायात आहुजांचा सहभाग

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पुण्यातील पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित झाले. कारण गुन्हा घडून, त्याचा व्हिडीओ समोर येऊनही पोलिसांनी या आरोपीला अटक तर सोडाच साधा गुन्हा देखील दाखल केला नव्हता

पुणं हे राज्याचं सांस्कृतिक शहर . या शहरावर सध्या गँगवार आणि बलात्कार आणि श्रीमंत बापाच्या लेकरांनी संकट आणलंय. या घटनांमुळे पुण्याचं नाव देशात बदनाम होतंय. मात्र याच कुठलंच सोयरं सुतकं पोलिसांना नाही असं म्हटलं तरी चुकीचं नाही कारण पोलिसांच्या नाक्कावर टिच्चून होणारे गुन्हे आणि पोलिसांचा पुण्यात संपलेला धाक हा पुण्याला बिहार कडे घेऊन जातोय. your time start now असं पोलिसांना म्हणायची वेळ आलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com