Santosh Deshmukh : हॉटेलमधला घास, आवळणार फास, 'असा' रचला देशमुखांच्या हत्येचा कट? गोपनीय साक्षीदारांचा धक्कादायक जबाब

Santosh Deshmukh Murder Case : सरपंच हत्या प्रकरणी कराड टोळीचं टेन्शन वाढवणारी धक्कादायक माहिती समोर आलीय.
Santosh Deshmukh Murder Case
Santosh Deshmukh Murder CaseSaam Tv News
Published On

बीड : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराड टोळीला फासावर लटकवण्यासाठी महत्वाच्या ठरणाऱ्या 5 गोपनीय साक्षीदारांचे जबाब समोर आलेत. तर तिरंगा हॉटेलवर जेवण करताना देशमुखांच्या हत्येचा कट कसा रचला गेला ? याबरोबरच या हत्या प्रकरणात मैलाचा दगड ठरणारी माहिती समोर आलीय.

पहिल्या गोपनीय साक्षीदाराचा जबाब

विष्णू चाटे-सुदर्शन घुलेमधील संवाद

विष्णू चाटे - आम्ही कमवायचं आणि तुम्ही वाटोळं करायचं. स्वतःची आणि आमची पण इज्जत घालवली. तुला प्लांट बंद करायला पाठवले होते. तो तुम्ही बंद केला नाही. उलट हात हलवत परत आलात.

सुदर्शन घुले - आम्ही कंपनी बंद करायला गेलो होतो. संतोष देशमुखनं आम्हाला कंपनी बंद करून दिली नाही. मस्साजोगच्या गावकऱ्यांनी हाकलून लावलं.

विष्णू चाटे- वाल्मिक अण्णांचा निरोप आहे. हे काम बंद करा. संतोष देशमुख आडवा आला. तर त्याला कायमचा धडा शिकवा.

विष्णू चाटे - वाल्मिक अण्णांच्या सांगण्याप्रमाणे संतोष देशमुखला कायमचा धडा शिकवा.

सुदर्शन घुले- आता मी कंपनी बंद करायला गेलो तर कुणीच अडथळा आणणार नाही असा बंदोबस्त करून दाखवतो.

Santosh Deshmukh Murder Case
Burhanpur Treasure : टॉर्चच्या प्रकाशात खोदले १०० खड्डे, सोनं-चांदी शोधण्यासाठी लोकांचा आटापीटा; प्रकरण काय?

दुसरा गोपनीय साक्षीदाराचा जबाब

6 डिसेंबर 2024 रोजी आवादा कंपनीमध्ये मला मारहाण झाली. मारहाणीनंतर मी संतोष देशमुखांना फोन केला. सुदर्शन घुलेसह साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करायला सांगितला. वाल्मिक कराडचे सर्व साथीदार नेहमी खंडणी मागतात. मलाही वाल्मिक कराडनं खोट्या गुन्ह्यात अडकवलं होतं.

तिसरा गोपनीय साक्षीदाराचा जबाब

प्रतिक घुले आणि सुधीर सांगळे हे सुदर्शन घुलेला भाऊ मानतात. ते सुदर्शन घुलेला भावा म्हणूनच बोलावतात. तिघांची परिसरात मोठी दहशत आहे. तिघेही वाल्मिक कराडच्या सांगण्यावरुन खंडणी गोळा करतात.

Santosh Deshmukh Murder Case
Beed Crime : रक्षकच झाला भक्षक! महिला दिनी पोलीस कर्मचाऱ्यानेच केला बलात्कार, बीड हादरलं

चौथा गोपनीय साक्षीदाराचा जबाब

वाल्मिकने जिल्ह्यात वर्चस्व राखण्यासाठी टोळ्या तयार केल्या. या टोळ्यांच्या माध्यमातून खंडणीची मागणी करतो. जी कंपनी खंडणी देणार नाही ती बंद करतो.

खंडणीसाठी अडथळा आणणाऱ्यांचं अपहरण आणि मारहाण हे नेहमीचंच आहे. त्याच्या दहशतीमुळे लोकं तक्रार दाखल करत नाहीत, पोलिसही गुन्हा दाखल करुन घेत नाहीत.

पाचवा गोपनीय साक्षीदाराचा जबाब

बापू आंधळे हत्या प्रकरणात कराडच्या सांगण्यावरुन मला अडकवलं. मला 90 दिवस कारागृहात राहावं लागलं. पोलीस कराडच्या सांगण्यावरुन गुन्हा दाखल करतात. सरपंच संतोष देशमुख हत्येनंतर कराड टोळीच्या खंडणी, अपहरण आणि मारहाणीचे प्रकार उघड झालेत. त्यातच आता गोपनीय साक्षीदारांनी दिलेला जबाब कराड टोळीला फासापर्यंत पोहोचवणार की बड्या धेंडांची वाट मोकळी करुन देणार? याकडे लक्ष लागलंय.

Santosh Deshmukh Murder Case
Pune Gaurav Ahuja : कारमधून उतरुन गैरवर्तन, बड्या बापाच्या 'सू'पुत्राचा माज उतरणार; गौरवचा मित्र भाग्येशच्या मुसक्या आवळल्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com