Pune Gaurav Ahuja : कारमधून उतरुन गैरवर्तन, बड्या बापाच्या 'सू'पुत्राचा माज उतरणार; गौरवचा मित्र भाग्येशच्या मुसक्या आवळल्या

Pune Gaurav Ahuja BMW Car : गौरव आहुजा हा पुण्यातील मनोज आहुजा या हॉटेल व्यावसायिकाचा मुलगा आहे. गौरव आहुजाने मद्यधुंद अवस्थेत कार चालवली आणि रस्त्याच्या मधोमधे कार थांबवत लघुशंका केली.
Gaurav Ahuja friend Bhagyesh Oswal in police custody
Gaurav Ahuja friend Bhagyesh Oswal in police custodySaam Tv News
Published On

पुणे : पुण्यातील येरवडा परिसरात एका तरुणाने मद्यधुंद अवस्थेत BMW कार चालवत प्रताप केलाय. एवढंच नाही तर त्याने भर सिग्नलवर कार थांबवून लघुशंका केली. जेव्हा लोकांनी त्याला हटकलं तेव्हा पॅट काढून गुप्तांग दाखवून पळ काढला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या माजोरड्या पोरांची कुंडली बाहेर काढली आहे. तर त्याचा मित्र भाग्येश ओसवाल याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

गौरव आहुजा हा पुण्यातील मनोज आहुजा या हॉटेल व्यावसायिकाचा मुलगा आहे. गौरव आहुजाने मद्यधुंद अवस्थेत कार चालवली आणि रस्त्याच्या मधोमधे कार थांबवत लघुशंका केली. नागरिकांनी त्याला हटकल्यानंतर त्याने अश्लील वर्तन केलं आणि तिथून पळ काढला. हे सर्व घडत असताना त्याचा मित्र ड्रायव्हरच्या साईडला असलेल्या सीटवर बसला होता. भाग्येश ओसवाल असं त्याचं नाव असून तो बिअरची बॉटल घेऊन बसला होता. आता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.

Gaurav Ahuja friend Bhagyesh Oswal in police custody
Gaurav Ahuja : गाडीत अश्लील चाळे करणाऱ्या गौरव अहुजाची कुंडली समोर, बाप लेक दोघेही गुन्हेगार

दरम्यान, पोराचा हा कारनामा ऐकून मनोज अहुजांनी यांनी मुलाचे वाभाडे बाहेर काढले आहेत. ते म्हणाले की, माझ्या मुलाने सिग्नलवर लघुशंका केली नसून माझ्या तोंडावर केली आहे. तो माझा मुलगा असल्याची मला लाज वाटते. पोलिसांनी मला शास्त्रीनगर पोलीस चौकीत बोलावलं आहे. व्हिडिओमध्ये जी गाडी दिसत आहे ती माझ्या नावावर आहे. त्यामुळे चौकशीसाठी पोलिसांनी मला बोलावलं आहे. माझ्या मुलाचं नाव गौरव मनोज अहुजा आहे. माझ्यावर जी काही कारवाई होईल ती मला मान्य आहे. मुलाचा मोबाईल सकाळपासून बंद आहे. आम्ही देखील त्याचा शोध घेत आहोत, असं म्हणत मुलांच्या वडिलांनी झालेल्या घटनेबद्दल खंत व्यक्त केली आहे.

Gaurav Ahuja friend Bhagyesh Oswal in police custody
IPL News : पाकिस्तानचा 'हा' स्टार खेळाडू पुढल्या वर्षी आयपीएल खेळणार, अडचण फक्त...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com