IPL News : पाकिस्तानचा 'हा' स्टार खेळाडू पुढल्या वर्षी आयपीएल खेळणार, अडचण फक्त...

Mohammad Amir IPL 2026 : आमिर हा पाकिस्तानचा एक घातक गोलंदाज आहे. त्याने अनेक वेळा संघासाठी दमदार कामगिरी केली आहे. पण आता त्याला आयपीएलमध्ये खेळायचे आहे.
Mohammad Amir IPL 2026
Mohammad Amir IPL 2026 Saam Tv News
Published On

नवी दिल्ली : पाकिस्तान क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू मोहम्मद अमीरने आयपीएलबाबत मोठी अपडेट दिली आहे. आमिरने सांगितलं आहे की, त्याला इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळायचं आहे. आमिरनं सांगितलं की तो २०२६ पर्यंत आयपीएलमध्ये खेळण्याची आशा बाळगतो. आमिर पाकिस्तान सोडून दुसऱ्या देशाचं नागरिकत्व मिळविण्याचा प्रयत्न करत आहे आहे.

आमिर हा पाकिस्तानचा एक घातक गोलंदाज आहे. त्याने अनेक वेळा संघासाठी दमदार कामगिरी केली आहे. पण आता त्याला आयपीएलमध्ये खेळायचे आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलमधून बंदी घातली आहे. आयपीएलमधील फिक्सिंग प्रकरणानंतर हे पाऊल उचलण्यात आले. आमिर म्हणाला पुढे म्हणाला की, पुढील वर्षी मला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळू शकते. जर तसं झालं तर मी आयपीएलमध्ये खेळणार आहे.

Mohammad Amir IPL 2026
Jasprit Bumrah : मुंबईला धक्का बसणार? चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर बुमराह आयपीएललाही मुकणार? रिपोर्टमध्ये नेमकं काय म्हटलंय?

दरम्यान, मोहम्मद आमिरची पत्नी नर्गिस ही यूकेची नागरिक आहे. मोहम्मद आमिरनेही यूके नागरिकत्वासाठी अर्ज केला आहे. जर त्याला नागरिकत्व मिळालं तर तो पाकिस्तान सोडून जाईल. अशा परिस्थितीत तो नियमांनुसार आयपीएलमध्ये खेळू शकतो. आमिर म्हणाला, पाकिस्तानी क्रिकेटपटूंना आयपीएलमधून बंदी घालण्यात आली आहे. पण आपले माजी क्रिकेटपटू आयपीएलमध्ये समालोचन करतात. अशा परिस्थितीत त्याचे आयपीएल खेळण्याचे स्वप्न पूर्ण हेईल का? हे लवकरच कळेल.

Mohammad Amir IPL 2026
Virat Kohli : कोहलीला 'विराट' विक्रम करायची संधी, फक्त ४६ धावा अन् किंगच्या नावावर होणार मोठा रेकॉर्ड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com