Pune Porsche Accident: अल्पवयीन आरोपीच चालवत होता पोर्शे कार, CCTV समोर

Minor Accused Driving Porsche Car CCTV: पोर्शे कार अपघातातील आरोपीच गाडी चालवत होता. याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.
पोर्शे कार अपघात
Pune Porsche AccidentSaam Tv

पुणे पोर्शे कार अपघातामध्ये गाडी नेमकं कोण चालवत होतं? यावरून मोठा गोंधळ निर्माण झाला होता. परंतु याचं उत्तर आता मिळालं आहे. अल्पवयीन आरोपीच पोर्शे कार चालवत असल्याचं समोर आलं आहे. याचं सीसीटीव्ही फुटेज साम टीव्हीच्या हाती लागलेलं आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये अल्पवयीन तरूणच गाडी चालवत असल्याचं दिसत आहे. हा अपघात १८ मे रोजी रात्री झाला होता.

अपघाताच्या आदल्या दिवसाचा सीसीटीव्ही व्हिडिओ (Pune Porsche Car Accident) समोर आलेला आहे. पुणे ड्रंक आणि ड्राईव्ह प्रकरणातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी गाडी चालवताना दिसत आहे. तसंच आरोपी खाली उतरताना देखील पाहायला मिळतंय. पुण्यातील ड्रंक आणि ड्राईव्ह प्रकरणातील अग्रवाल कुटुंबाच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यादरम्यान अल्पवयीन आरोपीचं गाडी चालवतानाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.

या सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट होत आहे, की अल्पवयीन आरोपी फक्त अपघाताच्याच नाही तर इतरही दिवशी गाड्या चालवत होता. लायसन्स नसताना देखील गाडी चालवत असल्याचं समोर (Porsche Car CCTV) आलं आहे. साम टीव्हीच्या हाती लागलेला हा व्हिडिओ अपघाताच्या आदल्या दिवशीचा असल्याचं सांगण्यात येत आहे. अपघाताच्या आदल्या दिवशीही पोर्शे कार अल्पवयीन आरोपीचं चालवत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे आरोपीच्या अडचणी आणखी वाढल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

पोर्शे कार अपघात
Pune Essay Competition: माझा बाप बिल्डर असता तर? पुण्यात भव्य निबंध स्पर्धा, विषय, ठिकाण अन् नियम सर्वच हटके; अनोख्या निषेधाची राज्यात चर्चा

अपघाताच्या दिवशी पोर्शे कार अल्पवयीन आरोपी चालवत (Pune News) नव्हता, असा दावा त्याच्या वडिलांकडून करण्यात आला होता. याप्रकरणी या आरोपीच्या वडिलांना आणि आजोबांना अटक देखील करण्यात आलेली आहे. याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. परंतु या अपघातावरून पोर्शे कार आरोपी चालवत असल्याचं स्पष्ट होत आहे. आता ही कार त्याच्याकडे कुणी आणि का दिली? असे प्रश्न उपस्थित होत (Pune Porsche Car Accident Video)आहेत. मद्यप्राशन करून हा तरूण गाडी चालवत असल्याचं देखील समोर आलेलं आहे.

पोर्शे कार अपघात
Pune Porsche Accident: 'रुग्णालय की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?' ससून हॉस्पिटल पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; पोर्शे अपघातावरुन विरोधकांनी घेरलं!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com