Pune News: तुम्हाला गुन्ह्यात अडकवतो..., आमदाराकडून थेट महापालिका आयुक्तांना धमकी; पुण्यातील राजकारणात खळबळ

Pune Municipal Commissioner: पुणे महानगर पालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम यांना आमदाराकडून धमकी देण्यात आली. ठेकेदारासाठी आमदाराने आयुक्तांना धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे.
Pune News: तुम्हाला गुन्ह्यात अडकवतो..., आमदाराकडून थेट महापालिका आयुक्तांना धमकी; पुण्यातील राजकारणात खळबळ
Pune Saam Tv
Published On: 
  • पुणे महापालिका आयुक्तांना आमदाराकडून धमकी

  • ९० कोटींच्या रस्ता निविदेवरून पुण्यात वाद

  • पुणे महापालिका ठेकेदार निविदेवरून वाद पेटला

  • मर्जीतल्या ठेकेदारासाठी आमदाराचा आयुक्तांवर दबाव

सागर आव्हाड, पुणे

पुणे महापालिकेच्या ९० कोटींच्या रस्ता प्रकल्पात मर्जीतील ठेकेदार डावलला गेल्याने संतापलेल्या एका आमदाराने महापालिका आयुक्तांनाच थेट धमकी दिली. या आमदाराने आयुक्तांना 'तुम्हाला गुन्ह्यात अडकवतो,' अशी धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. तसेच, पथ विभागातील अधिकाऱ्यांनाही 'विधानसभेत तुमच्याविरुद्ध हक्कभंग आणतो' अशी दमबाजी केल्याने प्रशासनात अस्वस्थता निर्माण झाली आहे. या प्रकाराबाबत विचारले असता आयुक्त नवलकिशोर राम यांनी दुजोरा दिला पण त्या आमदाराचे नाव सांगण्यास नकार दिला

आरटीओ चौक ते बंडगार्डन पूल परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुळा-मुठा नदीच्या कडेने १७ मीटर रुंद आणि २ किलोमीटर लांबीचा वेलस्ली रस्ता विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये निविदा काढली होती. यात ८ ठेकेदारांनी सहभाग घेतला होता. निविदा प्रक्रियेत एका पात्र ठेकेदाराला अपात्र ठरवून त्याऐवजी मर्जीतल्या ठेकेदाराला काम मिळवून देण्यासाठी आमदाराने प्रशासनावर दबाव आणला होता. या राजकीय हस्तक्षेपामुळे निविदा प्रक्रिया सुमारे सात महिने रखडली होती.

Pune News: तुम्हाला गुन्ह्यात अडकवतो..., आमदाराकडून थेट महापालिका आयुक्तांना धमकी; पुण्यातील राजकारणात खळबळ
Maharashtra Politics: भाजपविरोधात अजितदादांची राष्ट्रवादी आक्रमक, सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप; नेमकं काय घडलं?

अनेक महिने झाले, तरी निविदा प्रक्रिया पुढे जात नसल्याने महापालिका आयुक्तांनी जे योग्य आहे त्या पद्धतीने निविदेचे काम पुढे न्या आणि ठेकेदारांच्या पात्र-अपात्रतेबाबत निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. कागदपत्रांच्या छाननीनंतर आमदारांकडून ज्या ठेकेदाराला अपात्र ठरविण्यासाठी दबाव आणला जात होता, तोच ठेकेदार गुणवत्तेवर पात्र ठरला. तसेच आमदारांच्या ठेकेदारापेक्षा या पात्र ठेकेदाराने ९ कोटींनी खर्च कमी दाखविल्याने महापालिकेच्या निधीची बचत झाली. महापालिकेत खेटे मारूनही मर्जीतला ठेकेदार पात्र न ठरल्यामुळे त्या आमदाराने आयुक्तांना फोन करून, गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली, तसेच अन्य अधिकाऱ्यांनाही दमबाजी केली.

Pune News: तुम्हाला गुन्ह्यात अडकवतो..., आमदाराकडून थेट महापालिका आयुक्तांना धमकी; पुण्यातील राजकारणात खळबळ
Pune News: MPSC च्या विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं, शेवटच्या चिठ्ठीतून धक्कादायक कारण समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com