Pune Politics: अजित पवारांशी युती नकोच! मुंबईनंतर पुण्यातही काँग्रेसचा स्वबळाचा नारा

Pune Corporation Election: मुंबईनंतर काँग्रेसने पुणे महानगरपालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याची घोषणा केलीय. अजित पवारांशी कोणत्याही प्रकारची युती होणार नाहीये.
Pune Corporation Election:
Pune Congress city president Arvind Shinde addressing the media on the party’s decision to contest civic polls independently.saam tv
Published On
Summary
  • मुंबईनंतर पुण्यातही काँग्रेसचा स्वबळाचा नारा

  • अजित पवारांशी युती न करण्याचा हायकमांडचा आदेश

  • पुणे महापालिका निवडणूक स्वतंत्र लढवणार

महापालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमवर पुण्यामधील राजकारणात मोठ्या घडामोडी होत आहेत. एकीकडे भाजपनं उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. दुसरीकडे दोन्ही राष्टवादी एकत्र आल्या आहेत. मात्र त्यावेळी काँग्रेसने महाआघाडीत बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. मुंबईनंतर पुण्यातही काँग्रेसने स्वबळाचा नारा दिलाय. याबाबतच्या निर्णयाची माहिती पुणे काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी दिलीय.

Pune Corporation Election:
Shiv Sena-MNS Seat Sharing: पुणे महापालिका निवडणुकीत शिवसेना-मनसे किती जागा लढवणार? फॉर्म्युल्याची आतली बातमी फुटली

पुण्यामध्ये काँग्रेसने महाविकास आघाडीसोबत एकत्रित निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता, मात्र आता काँग्रेसनं स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे पुण्यातील अटीतटीचा लढती पहावायस मिळणार आहे. कारण आता महायुतीसह महाविकास आघाडीमधील पक्षही एकमेकांच्या विरोधात रिंगणात उतरणार आहेत. दरम्यान पुण्यात काँग्रेस ठाकरे गटासोबत युती करेल असा अंदाज आहे.

Pune Corporation Election:
कंठ दाटला, डोळ्यात पाणी; नाशिकच्या राड्यानंतर फरांदे स्पष्टच बोलल्या, थेट भाजपची चूक सांगितली

पक्षश्रेष्ठींनी त्याबाबत शहरातील कार्यकर्त्यांना सुचना केल्या आहेत. पुण्यात ठाकरे आणि इतर कोणी येत असेल तर त्यांच्याशी चर्चा करा मात्र अजित पवारांशी युती करू नका, असा स्पष्ट आदेश काँग्रेस पक्षाच्या हायकमांडनं दिलेत. या काँग्रेसच्या निर्णयानंतर अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवाडुच्या युतीचा मार्ग मोकळा झालाय.

पुण्यात २००७ पासून काँग्रेसची पीछेहाट

तत्कालीन खासदार सुरेश कलमाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यातील वादामुळे पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना यांची युती झाली. त्याला पुणे पॅटर्न असे नाव देण्यात आले. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेचे पदाधिकारी पुण्यात सत्तेवर आलेत. त्यानंतर दोन वर्षात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची एकत्रित सत्ता महापालिकेत आली. तेव्हा ते २०१७ पर्यंत सत्तेत होते.

दरम्यान २०१७ मध्ये भाजपने चार नगरसेवकांचा एक प्रभाग केल्याने सर्वच विरोधी पक्षांचे हाल झाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जागावाटपावरून वाद झाल्याने काही प्रभागात ते आघाडी करून लढले तर काही प्रभागांत एकमेकांविरुद्ध लढले. त्यामुळे दोन्ही पक्षांना भाजप पुढे पराभव पत्करावा लागला होता. यात काँग्रेसचे केवळ नऊ नगरसेवक निवडून आले. त्यांच्यासोबत रवींद्र धगेकर अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com