कंठ दाटला, डोळ्यात पाणी; नाशिकच्या राड्यानंतर फरांदे स्पष्टच बोलल्या, थेट भाजपची चूक सांगितली

Nashik Politics Devyani Pharande Gets Emotional : नाशिकच्या राजकीय वादावर प्रतिक्रिया देताना भाजप नेत्या देवयानी फरांदे भावनिक झाल्या. त्यांनी महापालिका निवडणुकीपूर्वी वादग्रस्त प्रवेशाबद्दल स्वतःच्या पक्षावर उघडपणे टीका केली आहे.
Nashik Politics Devyani Pharande Gets Emotional
BJP leader Devyani Pharande speaking emotionally to the media during the Nashik political controversy.
Published On
Summary
  • नाशिकमध्ये भाजपमधील अंतर्गत वाद उफाळून आला

  • देवयानी फरांदे यांनी पक्ष नेतृत्वावर थेट नाराजी व्यक्त केली

  • कार्यकर्त्यांचा बळी दिला जात असल्याचा आरोप

डोळ्यासमोर कार्यकर्त्याचा बळी दिला जात असेल तर योग्य नाही. आज जे घडलं ते मला आवडलेलं नाही, डोळ्यांसमोर कार्यकर्त्याचा बळी दिला जात असेल तर योग्य नाही, असं म्हणताना भाजप नेत्या देवयानी फरांदे यांनी गगिवरून आलं. आज गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उबाठा शिवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे, मनसेचे माजी महापौर आणि उबाठा नेते यतीन वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावरून नाशिकमध्ये मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं.

नाशिकमध्ये शिवसेना आणि भाजपच्या जागावाटपाचा प्रश्न अनुत्तरित राहिला असताना भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. भाजपच्या नेत्या नाशिक महापालिका निवडणूक प्रमुख देवयानी फरांदे यांच्या संमतीशिवाय झालेल्या पक्ष प्रवेशामुळे त्या नाराज आहे. त्यांनी जाहीररित्या आपली नाराजी बोलून दाखवली. या पक्ष प्रवेशाप्रकरणी बाजू मांडताना त्या भावूक झाल्याचं पाहायाला मिळालं.

नाशिकमध्ये आज हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. विरोधी पक्षातील ५ बड्या नेत्यांचा भाजप पक्षप्रवेश झाला. यात उद्धवसेनेचे नेते विनायक पांडे, यतीन वाघ, मनसेचे दिनकर पाटील, काँग्रेसचे शाहू खैरे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील माजी आमदार नितीन भोसले यांचा समावेश आहे. मात्र या पक्षप्रवेशामुळे भाजपातील अंतर्गत नाराजी उफाळून आली. नाशिकमधील भाजप निवडणूक प्रभारी आमदार देवयानी फरांदे यांचा पक्षप्रवेशाला विरोध केला होता. फरांदे समर्थकांनी शहर कार्यालयाबाहेर जोरदार गोंधळ घातला. मात्र फरांदे यांची नाराजी असतानाही मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीत नेत्यांचा पक्षप्रवेश घेण्यात आला.

या पक्षप्रवेशानंतर देवयानी फरांदे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांचे डोळे पाणावले होते. आपला कोणालाही विरोध नाही. विरोध करण्यापेक्षा अतिशय सक्षम उमेदवार बबलू शेलार यांचा प्रवेश झाला होता. पक्षाचे 3 असे पॅनल केलं असतं तर निवडून आले असते. कार्यकर्ते काम करत असतात. त्यांना निवडून येण्याचे संकेत होते. पक्ष विजयी होईल असा विश्वास होता,असं फरांदे म्हणाल्या. आपली बाजू मांडताना फरांदे भावूक झाल्याचं पाहायला मिळल्या.

Nashik Politics Devyani Pharande Gets Emotional
Uddhav Thackeray: मराठी माणसा, चुकशील तर संपशील! उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानं राजकारण तापलं

त्यांचा कंठ दाटून आला होता, त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. त्या म्हणाल्या, कंठ दाटून येण्याचे कारण म्हणजे मी सामान्य कार्यकर्ते आहे. डोळ्यांसमोर कार्यकर्त्याचा बळी दिला जात असेल तर योग्य नाही. पक्षात आलेल्यांची मी स्वागत करते, पण आज जे घडलं ते मला आवडलेलं नाही. मला कोंडीत पकडायचे असेल तर पकडा मी घाबरत नाही. या सगळ्या विषयांच्या माध्यमातून जुन्या नेत्यांनी उभे राहिले असते तर कार्यकर्त्यांना वेगळा संदेश गेला असता.

Nashik Politics Devyani Pharande Gets Emotional
Corporation Election: युती झाली पण लढाई सोप्पी नाही; ठाकरे बंधूंना रोखण्यासाठी भाजपचा प्लान काय?

गिरीश महाजन यांच्याबाबत भाष्य करताना त्या म्हणाल्या मी त्यांच्यावर नाराज नाही. पण त्यांना चुकीच्या पद्धतीने ब्रिफ केलं गेलं. काही दलालांनी स्वार्थासाठी प्रवेश केला. निष्ठावंत कार्यकर्त्यांची भूमिका वरिष्ठांकडे मांडणार विरोधक भाजपमध्ये आले त्यांचे स्वागत केले. माझे पती यांनी पक्षासाठी काम केलं. महाराष्ट्र पिंजून काढला होता. माझ्यावर अन्याय झाला तरी मी कधी बोलले नाही, मात्र निवडणूक प्रक्रियेत आपण सक्रिय राहू याची पक्षाच्या वरिष्ठांनी याची दखल घ्यावी असंही त्या म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com