Pune : तपासाच्या नावाखाली पर्यटन! पुण्यातील महिला पोलिस अधिकाऱ्यासह तिघांवर कारवाई, दोन वर्षांची वेतनवाढ थांबवली

Pune Police Update News : पुण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकासह तीन पोलिस कर्मचाऱ्यांनी तपासाच्या नावाखाली कास पठार आणि इतर पर्यटनस्थळांना भेट दिल्याचा प्रकार विभागीय चौकशीत उघड झाला.
PUNE POLICE OFFICERS PENALIZED FOR MISUSING INVESTIGATION TRIP AS KAS PLATEAU TOUR
PUNE POLICE OFFICERS PENALIZED FOR MISUSING INVESTIGATION TRIP AS KAS PLATEAU TOURSaam Tv
Published On
Summary
  • पुण्यातील महिला PSI सह तीन पोलिस कर्मचाऱ्यांनी तपासाऐवजी कास पठार व इतर पर्यटनस्थळांना भेट दिली

  • तिघांची दोन वर्षांसाठी वार्षिक वेतनवाढ रोखली

  • या प्रकारामुळे पोलिस दलाची प्रतिमा मलिन

गेल्या काही दिवसांपासून पोलिसांचे अनेक "पराक्रम" समोर आले आहेत. कधी पोलिस कर्मचारी दरोड्याचा प्रयत्न करतात कधी पर्यटकांना लुटण्याचे काम करतात तर कधी काय! आता आणखी एक कारनामा पुण्यातून समोर आला आहे. तपासाच्या नावाखाली पोलिस कर्मचारी चक्क सातारा जिल्ह्यातील कास पठार सह इतर पर्यटनस्थळी वर्षाविहार करून आले आहेत! पुणे शहर पोलिस दलातील एक महिला अधिकारी आणि इतर दोन कर्मचाऱ्यांनी हे कृत्य केल्याचं समोर आलं आहे. यामुळे पुणे पोलीस दलातील एका महिला पोलीस उपनिरीक्षकासह तिघांवर प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे.

पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यातील कार्यरत असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार आणि पोलीस शिपाई अशा तीन जणांचे २ वर्षांसाठी वार्षिक वेतनवाढ रोखण्याची शिक्षा अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांनी सुनावली आहे. हा सगळा प्रकार ४ एप्रिल रोजी घडला. विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस उपनिरीक्षक या पोलीस हवालदार आणि महिला पोलीस शिपाई आणि फिर्यादी यांना सोबत घेऊन सातारा येथे गेल्या होत्या. मात्र, गुन्ह्याचा तपास करण्याऐवजी केवळ मोघम स्वरूपाचा तपास करून इतर वेळ पर्यटनासाठी खर्च केल्याचे विभागीय चौकशीतून समोर आले आहे.

PUNE POLICE OFFICERS PENALIZED FOR MISUSING INVESTIGATION TRIP AS KAS PLATEAU TOUR
Health Care : रात्री झोपताना तुमच्याही पायात गोळा येतो का? 'या' गंभीर आजाराचे असू शकतात संकेत

घटनास्थळी चौकशी नाही पण ढाब्यावर जेवण महत्त्वाचं?

हे तिघे ही जणं ४ एप्रिल रोजी साताऱ्यात पोहचले. सातारा जिल्ह्यात पोहचताच त्यांनी सर्वप्रथम तपासासाठी दाखल असल्याचे कळवणे सातारा पोलिसांना माहिती देणे अपेक्षित होते. मात्र तसे न करता त्यांनी प्रसिद्ध कणसे ढाब्यावर भोजन केलं आणि दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास शाहूपुरी पोलीस ठाण्यात हजेरी लावली आणि घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मात्र, पंचनाम्यानंतर घटनास्थळावरील व्यक्ती किंवा परिसरातील नागरिकांकडे कोणतीही चौकशी करण्यात आली नसल्याचे चौकशीतून समोर आलं आहे.

PUNE POLICE OFFICERS PENALIZED FOR MISUSING INVESTIGATION TRIP AS KAS PLATEAU TOUR
Health Care : सकाळी उठल्यानंतर अंगदुखी जाणवते? झोपण्यापूर्वी 'हे' ६ उपाय नक्की करा

पोलिसांकडून कास पठारची सफर आणि वर्षाविहार

पंचनामा झाला, स्थानिक पोलिस ठाण्यात अहवाल दिला आणि तिघे निघाले. घटनेचा पंचनामा कोणाची ही चौकशी न करता या तिघांनी चौकशी पूर्ण झालं असं बहुदा ठरवलं होतं. पुण्याकडे परतणे अपेक्षित होतं मात्र संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांनी थेट साताऱ्याचे प्रसिद्ध कास पठार गाठले. इतकचं काय तर त्यांनी अन्य प्रेक्षणीय स्थळांवर सुद्धा भेटी दिल्याचे आता चौकशीत स्पष्ट झाले आहे. दरम्यान, या तिघांसोबत असलेल्या फिर्यादी यांनी या तिघांना घरी आई आजारी असून पुण्यात लवकर निघण्यासाठी विनंती केली होती. मात्र या विनंतीकडे या तिघांनी दुर्लक्ष केलं. चौकशी अंती या तिघांवर आता तपासाच्या नावाखाली पर्यटनाचा आनंद घेतल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

PUNE POLICE OFFICERS PENALIZED FOR MISUSING INVESTIGATION TRIP AS KAS PLATEAU TOUR
Naivedya Thali : नैवेद्याची थाळी कशी सजवावी? 'या' सोप्या ६ टिप्स गृहिणींनी लक्षात ठेवाव्यात

महिला फिर्यादी यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीरता नाही

साताऱ्यातील पर्यटन स्थळे फिरून झाल्यानंतर पोलिस आणि फिर्यादी ratei १ वाजता पुण्यात पोहचले. यावेळी सुद्धा पोलिसांकडून महिला फिर्यादीच्या सुरक्षिततेची काळजी घेतली नसल्याचं निष्पन्न झालं आहे. प्रथम फिर्यादी यांना स्वारगेट बसस्थानकावर सोडण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. फिर्यादी यांनी विनंती केल्यावर त्यांना शनिवार पेठ पोलीस चौकीजवळ सोडण्यात आले. कुठल्या ही महिला फिर्यादीला सुरक्षितपणे तिच्या घरी पोहोचविणे अपेक्षित असताना तसे न केल्याने या पोलिसांनी कर्तव्यात कसूर केल्याचं चौकशीत नमूद करण्यात आले आहे.

PUNE POLICE OFFICERS PENALIZED FOR MISUSING INVESTIGATION TRIP AS KAS PLATEAU TOUR
Rain Alert : राज्यात पाऊस थैमान घालणार, ३१ जिल्ह्यांना हाय अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?

"खाकीला डाग", पोलिसांची प्रतिमा झाली मलिन

या संपूर्ण प्रकरणाची विभागीय चौकशी करण्यात आली आणि संबंधित अहवाल समोर आला. या अहवालानुसार महिला पोलिस उपनिरीक्षक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कर्तव्यात बेशिस्तपणा, निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणा केला असून परिणामी पोलीस दलाची प्रतिमा जनमानसात मलीन झाली, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. आता पुढील दोन वर्षांसाठी वार्षिक वेतनवाढ रोखण्याची शिक्षा त्यांना सुनावण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com