कडक "फुलचंद" खाताय? पानांमधून अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टपऱ्यांवर पुणे पोलिसांचा वॉच

Drug Smuggling via Paan Stalls: पान दुकानांमार्फत अमली पदार्थांच्या तस्करी होत असल्याचं समोर आले आहे. पुणे शहरात मागील काही महिन्यांपासून अमली पदार्थांची मोठ्या प्रमाणावर तस्करी वाढली आहे.
Pune Police step up surveillance on paan stalls as part of a major crackdown on drug smuggling under the ‘Drug Free Pune’
Pune Police step up surveillance on paan stalls as part of a major crackdown on drug smuggling under the ‘Drug Free Pune’
Published On

अमली पदार्थांच्या खरेदी, विक्रीचे प्रस्थापित झालेले जाळे तोडून टाकण्यासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली आहे. "ड्रग्स फ्री पुणे" या मोहिमेचा आणखी मोठा विस्तार करण्यासाठी पुणे पोलिसांनी आता नवीन ऍक्शन प्लॅन तयार केला आहे. पुणे शहरात मागील काही महिन्यांपासून अमली पदार्थांची मोठ्या प्रमाणावर तस्करी वाढली आहे. विशेषतः देशातंर्गत यासह अमली पदार्थांचे आंतरराष्ट्रीय नेक्सस सुद्धा उघडकीस आली आहेत. याच पार्श्वभूमीवर अमली तस्करांची पुरवठा साखळी मोडीत काढण्यासाठी पुणे पोलिसांनी पावले उचलायला सुरुवात केली आहे.

Pune Police step up surveillance on paan stalls as part of a major crackdown on drug smuggling under the ‘Drug Free Pune’
Ashok Kharat Case: भोंदू बाबा अशोक खरातसोबत फोटो असणाऱ्या नेत्यांवर कारवाई होणार का? काय म्हणाले मुख्यमंत्री?

अमली पदार्थांची विक्री, तसेच तस्करी करण्याची एक नवीन "स्टाईल" तस्करांनी तयार केल्याचं समोर आलं आहे. सध्या पुणे शहरातील पान टपऱ्या किंबहुना खाण्याचे पान तयार करणाऱ्या दुकानांमध्ये 'कडक फुलचंद' या पानाच्या नावाखाली पांढऱ्या पावडरमध्ये घातक अंमली पदार्थांचे मिश्रण करून विक्री केल्याचा धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथक २ ने पुण्यातील बाणेर पोलीस ठाण्याच्या हदद्दीतील "सिद्धेश्वर पानवाला" येथे छापा टाकला.

Pune Police step up surveillance on paan stalls as part of a major crackdown on drug smuggling under the ‘Drug Free Pune’
Pune Crime: पुणे हादरले! समलिंगी संबंधाला विरोध केला, १२ वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या

यावेळी अमली पदार्थ मिश्रित बुकटी वापरून झिंग (नशा) आणणारे खाण्याचे पान विक्री करीत असल्याचं दिसून आलं. याप्रकरणी बसवराज मानतप्पा काढा, लक्ष्मीकांत मानतप्पा काढा, चंद्रकात श्रीशैल बिरादार यांच्या ताब्यातून एकुण ७.५ लाख रुपये किंमतीचे ८ किलो ७६० ग्रॅम वजनाची अंमली पदार्थ मिश्रित भुकटी (पावडर) व ०३ मोबाईल फोन असा ऐवज जप्त करण्यात आला. पिंपरी चिंचवड पोलिसांनी सुद्धा अशाच प्रकारची कारवाई काही दिवसांपूर्वी केली होती.

एक कडक फुलचंद पान आणि त्याची झिंग

पुणे असो किंवा इतर शहरं याठिकाणी पानाच्या टपरीवर किंवा दुकानात सर्वाधिक मागणी असलेलं पान म्हणजे "फुलचंद". "एक फुलचंद टाकू" असं म्हणणारे अनेक जणं तुमच्या आजूबाजूला अवतरले असतील. हे पान अधिक "स्ट्राँग" किंवा "कडक" व्हावं म्हणून पान टपरी चालवणारे या पानात किमाम, चुना, कात, केशर यासोबत अमली पदार्थ मिश्रित बुकटी तयार करून ती पानात टाकली जाते जेणे करून ते खाल्ल्यावर आणखी झिंग चढावी. काही जणांकडून पानात टाकणाऱ्या पांढऱ्या पावडरमध्ये अँफेटामाइन, बेंझोडायझेपाइन्स, ओपिएट्स आणि मेथॅम्फेटामाइन यांसारखी मानवी मेंदूवर घातक परिणाम करणारी द्रव्ये याचा वापर करतात.

पुण्यातील पान टपऱ्यांवर स्पेशल वॉच

या रॅकेटचे धागेदोरे आंतरराज्य टोळ्यांशी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्यामुळे आता पुणे पोलिसांकडून पान टपऱ्यांवर स्पेशल वॉच ठेवायचा निर्णय घेतला आहे. फुलचंद पान विकणाऱ्या अनेक पान टपऱ्या, पानाची दुकानं शहरात प्रसिद्ध आहेत. यासोबतच काही छोटे पान टपरी वर सुद्धा फुलचंद पानाला चांगली मागणी आहे. त्यामुळे शहरातील अशा पान टपऱ्यांवर पोलिसांकडून करडी नजर ठेवण्यात येणार आहे.

विद्येचं माहेरघर असं ऐटीत मिरवणारे पुणे गेल्या काही दिवसांत अमली पदार्थांच्या विळख्यात सापडलं आहे याला नियंत्रण घालण्यासाठी आता स्थानिक पोलिस ठाण्यात सुद्धा अमली पदार्थ विरोधी पथकाची स्थापना करण्याचा निर्णय आज पुणे पोलिस आयुक्तालयात झालेल्या बैठकीत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतला आहे.

अमली पदार्थांची विक्री खरेदी? अ‍ॅप वर करता येणार तक्रार

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर चाप बसवा म्हणून पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने पी टी पी या नावाने मोबाईल ऍप्लिकेशन तयार केले होते. या ऍप्लिकेशन मध्ये सामान्य पुणेकरांना सहभाग नोंदवता येतो. वाहतुकीचे नियम मोडला जात असेल तर कुठे ही आणि कोणीही या ऍप वर संबंधित छायाचित्र अपलोड करून तक्रार करू शकतं.

याच पार्श्वभूमीवर आता पुणे पोलिसांकडून ड्रग्ज विरोधी ऍप्लिकेशन तयार केले जाणार आहे. या माध्यमातून सामान्य नागरिक अमली पदार्थांची विक्री, खरेदी किंवा इतर माहिती थेट फोटो, व्हिडीओ व लोकेशन या स्वरूपात पाठवू शकणार आहेत. माहिती पाठविणार्‍याची माहिती अत्यंत गुप्तता पाळली जाणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com