Pune : खांद्यावर स्टार, अंगावर खाकी; डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिळवण्यासाठी तरुणी बनली थेट PSI

Pune Crime News Today : पुण्यात २५ वर्षीय तरुणीला पोलीस उपनिरीक्षकाचा गणवेश परिधान करून स्वतःला पोलीस अधिकारी म्हणून सादर केल्याप्रकरणी अटक करण्यात आली.
Pune Crime News Today
Pune Crime News Today Saam TV Marathi
Published On

woman arrested for posing as police officer in Pune : अंगावर खाकी आणि खांद्यावर स्टार लावून फिरणाऱ्या तोत्या "लेडी सिंघम" ला पुण्यात अटक कऱण्यात आली आहे. २५ वर्षीय तरुणीला पुण्यातील लष्कर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी बेड्या ठोकल्या आहेत. संबंधित तरुणी पोलीस उपनिरीक्षक दर्जाचा गणवेश परिधान करून नागरिकांवर रुबाब दाखवत असल्याचे समोर आल्यानंतर कारवाई कऱण्यात आली.

एका नामांकित क्लिनिकमध्ये अपॉइंटमेंट मिळावी म्हणून पोलिसांचा गणवेश धारण केला होता. समिना आसिफ इनामदार उर्फ समिना अयुब पठाण (वय २५) असे अटक केलेल्या महिला आरोपीचे नाव आहे. ही कारवाई शनिवार पुण्यातील कॅम्प परिसरात करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेचे पोलिस बनण्याचे स्वप्न भंगले होते. काही दिवसांपासून ती एक खासगी कंपनी मध्ये काम करत होती.

Pune Crime News Today
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात खटाखट ₹३००० येणार? मे-जूनचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता, पाहा महत्त्वाची अपडेट

६ जून रोजी पुण्यातील लष्कर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक महेश शिंदे कॅम्प परिसरात गस्तीवर असताना त्यांना आरोपी पोलिसांच्या वर्दीत एका खाजगी क्लिनिक बाहेर उभी असल्याचे दिसले. शिंदे यांना संबंधित महिला पोलिस नसल्याचा संशय आला. त्यांनी त्यांच्या महिला कर्मचाऱ्याच्या मदतीने संबंधित महिलेकडे जाऊन कुठल्या पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत, आय डी आहे का? यासारखे पोलिसी भाषांतील प्रश्न विचारले असता महिलेची बोलती बंद झाली. अधिक चौकशी करता तोतया असल्याचे निष्पन्न झाले.

Pune Crime News Today
Monsoon Update : मान्सून कोकणात आला, पण राज्यभर पोहोचायला अडथळा; सरकारनं दिला महत्त्वाचा इशारा

समिना हिला एका खासगी क्लिनिकमध्ये उपचारांसाठी डॉक्टरांची वेळ हवी होती. मात्र, तिला डॉक्टरांची वेळ मिळत नव्हती. त्यामुळे तिने पोलिसांचा गणवेश परिधान करून रिसेप्शन आणि अन्य लोकांवर आपण पोलिस असल्याचा दबाव टाकून अपॉईंटमेंट मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे प्राथमिक तपासात समोर आलं आहे.

Pune Crime News Today
२ कोटी कॅश, १३ फ्लॅट्स, ५ आलिशान घरं... सरकारी इंजिनिअरची 'काळी कमाई' पाहून अधिकारीही चक्रावले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com