Pune Liquor Update : विषारी दारूने पुणे हादरले, मृतांचा आकडा २४ वर; CID करणार तपास

Pune Toxic Liquor Case Update : पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील विषारी दारू प्रकरणात मृतांचा आकडा २४ वर पोचला आहे. हडपसरमध्ये आणखी दोन जणांचा मृत्यू झाल्यानंतर तपास CID कडे सोपवण्यात आला असून अवैध दारू विक्रेत्यांविरोधात पोलिसांची मोठी कारवाई सुरू आहे.
PUNE TOXIC LIQUOR CASE: DEATH TOLL REACHES 24, CID FORMS FIVE SPECIAL TEAMS FOR INVESTIGATION
PUNE TOXIC LIQUOR CASE: DEATH TOLL REACHES 24, CID FORMS FIVE SPECIAL TEAMS FOR INVESTIGATIONSaam Tv
Published On
Summary
  • पुणे आणि पिंपरी चिंचवड विषारी दारू प्रकरणातील मृतांचा आकडा २४ वर

  • हडपसरमधील विकास केदारी आणि निलेश घोलप यांचा उपचारादरम्यान मृत्यू

  • तपास सीआयडीकडे सोपवला

  • मुख्य आरोपी योगेश वानखेडेसह सात जणांना अटक

सचिन जाधव, पुणे

Pune Pimpari Chinchwad Toxic Liquor Case Update 24 Dies पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसराला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारू प्रकरणातील मृतांचा आकडा आता २४ वर पोचला आहे. हडपसरमधील काळेपडळ परिसरात आणखी दोन जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर प्रशासन आणि पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास आता राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) सोपवण्यात आला असून, तपासासाठी पाच विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हडपसरमधील ससाणे नगर (Pune Hadpasar Sasane Nagar) येथील विकास किसन केदारी (वय ६०) (Vikas Kedari) आणि निलेश घोलप (वय ४५) (Nilesh Gholap) यांचा विषारी दारू पिल्याने मृत्यू झाला आहे. बुधवारी सकाळी दारू पिल्यानंतर दोघांनाही चक्कर येणे, तोंडातून फेस येणे अशी लक्षणे दिसून आली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. विशेष म्हणजे या दोघांबाबत पोलिसांकडे यापूर्वी कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले आहे.

PUNE TOXIC LIQUOR CASE: DEATH TOLL REACHES 24, CID FORMS FIVE SPECIAL TEAMS FOR INVESTIGATION
Maharashtra Monsoon : महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट, मराठवाड्यावर सर्वात मोठं सकंट; हवामान विभागाच्या अंदाजाने धाकधूक वाढली

दरम्यान पुणे शहरातील मृतांची संख्या ९ वर पोहोचली असून, पुणे आणि पिंपरी चिंचवड (Pune And Pimpari Chinchwad) मिळून एकूण २४ जणांचा बळी गेला आहे. दरम्यान, काही रुग्णांवर अद्याप विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी योगेश वानखेडे याच्यासह सात जणांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी CID च्या ताब्यात देण्यात आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग, पुणे व पिंपरी चिंचवड पोलीस यांनी प्राथमिक तपास केला असला तरी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता आता CID कडून व्यापक चौकशी केली जाणार आहे.

PUNE TOXIC LIQUOR CASE: DEATH TOLL REACHES 24, CID FORMS FIVE SPECIAL TEAMS FOR INVESTIGATION
Mumbai Rain Alert : मुंबईत मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी, 'या' शहरांना यलो अलर्ट जारी; वाचा हवामानाचा अंदाज

दुसरीकडे, विषारी दारूमुळे मृत्यू झाल्यानंतर काळेपडळ पोलिसांनी अवैध हातभट्टी आणि गावठी दारू विक्रेत्यांविरोधात मोठी मोहीम हाती घेतली आहे. पांढरेमळा परिसरात छापेमारी करून चार जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून १८० सीलबंद गावठी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच परिसरातील अनेक अवैध दारू अड्ड्यांवर कारवाई करून ते उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. या घटनेमुळे अवैध दारू व्यवसायावर नियंत्रण ठेवण्याच्या यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com