Cyber Crime News : शेअर ट्रेंडिगमधून मोठा नफा मिळवून देण्याचं आमिष, पुण्यातील तिघांची सव्वा कोटींची फसवणूक

Pune Cyber Crime News : पुण्यात शेअर ट्रेडिंगमध्ये मोठा नफा देण्याचे आमिष दाखवत सायबर ठगांनी कोट्यवधींची फसवणूक केली. व्हॉट्सॲप ग्रुप व बनावट ॲपद्वारे हा घोटाळा करण्यात आला असून सायबर पोलिसांकडून तपास सुरू आहे.
Cyber Crime News : शेअर ट्रेंडिगमधून मोठा नफा मिळवून देण्याचं आमिष,  पुण्यातील तिघांची सव्वा कोटींची फसवणूक
Pune Cyber Crime NewsSaam Tv
Published On
Summary
  • पुण्यात शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली सायबर फसवणूक

  • व्हॉट्सॲप ग्रुप व बनावट ॲपद्वारे नागरिकांना गंडा

  • सायबर पोलीस, मार्केटयार्ड व वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

  • नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

सचिन जाधव, पुणे

पुण्यात शेअर ट्रेंडिंगमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत तीन जणांना कोट्यवधींचा गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यासह मार्केटयार्ड आणि वाघोली पोलीस ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान अलीकडे सायबर ठग्यांच्या तक्रारीत वाढ झाली असून ही वाढ चिंताजनक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदारांना व्हाट्सॲप ग्रुपद्वारे शेअर खरेदीतून अल्पावधीत मोठा नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवले. आरोपींनी एक ॲप जमा केला,मात्र कोणतेही शेअर खरेदी किंवा परतावा न देता आरोपींनी फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

Cyber Crime News : शेअर ट्रेंडिगमधून मोठा नफा मिळवून देण्याचं आमिष,  पुण्यातील तिघांची सव्वा कोटींची फसवणूक
Pune : 'मी महाराष्ट्र सोडून जाईन...', फेसबुक लाईव्ह करत परप्रांतीय तरुणाची आत्महत्या; धक्कादायक कारण आलं समोर, Video व्हायरल

हा फसवणुकीचा प्रकार २३ डिसेंबर २०२५ ते ११ जानेवारी २०२६ या कालावधीत घडला. सायबर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66 डी अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणातील तक्रारदार मूळचे मेघालय येथील असून सध्या ते लोहगाव येथील पोरवाल रस्ता परिसरात राहतात.

Cyber Crime News : शेअर ट्रेंडिगमधून मोठा नफा मिळवून देण्याचं आमिष,  पुण्यातील तिघांची सव्वा कोटींची फसवणूक
Today Weather News : राज्यात शेकोट्या विझल्या, उकाडा वाढला; किमान तापमान वाढीमुळे थंडी गायब; वाचा तुमच्या शहरात आजचे हवामान

तिन्ही प्रकरणात पोलिसांकडून बँक खाते, मोबाईल क्रमांक, डिजिटल लिंक आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे. पोलिस सायबर चोरट्याचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com