pune water shortage
pune water shortage saam tv

Breaking News : पुणेकरांनो पाणी जपून वापरा; शहरात 'या' दोन दिवशी पाणीपुरवठा राहणार बंद

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. पुण्यात आज, बुधवारी रात्रीपासून पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी दिवसभर पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे.
Published on

ज्ञानेश्वर हिंगोलीकर

Pune news : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. पुण्यात आज, बुधवारी रात्रीपासून पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी दिवसभर पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. नागरिकांनी कमी दाबाने पाणी मिळणार आहे. ऐन पावसाळ्यात पाणी समस्येशी पुणेकरांना सामोरे जावं लागणार असल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे दोन दिवस पाणी जपून वापरण्याचे आवाहन पुणे (Pune) महानगरपालिकेने केले आहे.

pune water shortage
Sangli News : सांगलीतील चोर समजून साधूंना मारहाण प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई

राज्यातील काही जिल्ह्यात तुफान पाऊस कोसळत आहे. पुण्यामध्ये काही दिवसांपूर्वीच जोरदार पाऊस बरसला. रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. त्यामुळे पुणेकरांना पाण्यातूनच घर गाठावं लागलं होतं. तर काही नागरिकांच्या घरातही पाणी शिरले होते. या पावसाळ्याच्या दिवसातच पुण्यात पाणी समस्येला सामोरे जावे लागणार असल्याने पुणेकरांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पुणेकरांना कमी दाबाचे पाणी मिळणार आहे. तर आज रात्री आणि गुरुवारी दिवसभर पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिकेने पुणेकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.

पुण्यातील चांदणी चौकातील पूल वाहतुकीसाठी बंद

पुण्यातील (Pune) चांदणी चौकातील पूल आज, बुधवारपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पुण्यातील वाढत्या वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी पूल पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर पूल १८ सप्टेंबर रोजी पाडण्यात येणार आहे. यामुळे रस्ते प्रवासासाठी पुणेकरांसाठी पर्यायी मार्ग जाहीर करण्यात आले आहे.

pune water shortage
'मुख्यमंत्रिपद काही काळ अजित पवारांना द्या, आम्ही...'; वेदांता प्रकल्पावरून सुप्रिया सुळेंनी साधला शिंदेंवर निशाणा

पुण्यातील चांदणी चौकातील पूल पाडण्यात येणार आहे. सदर पूल पाडण्यासाठी पुलाच्या भिंतींना ड्रिलींग करण्याचे काम सुरू झालं आहे. स्फोटानंतर चांदणी चौकातील पूल हा ९ ते १० सेंकदांमध्ये जमिनदोस्त होणार आहे. तसेच हा पूल पाडण्याठी Edifice engineering या कंपनीची NHAI ने निवड केली आहे. याच कंपनीने दिल्लीमधील ट्ववीन टॉवर्स पाडले होते. सदर पूल पाडल्यानंतर त्याजागी नवीन उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com