'मुख्यमंत्रिपद काही काळ अजित पवारांना द्या, आम्ही...'; वेदांता प्रकल्पावरून सुप्रिया सुळेंनी साधला शिंदेंवर निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून राज्याला दुसरा मोठा प्रकल्प देण्याचे आश्वासन दिलं आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे.
Supriya sule and eknath shinde
Supriya sule and eknath shinde saam tv

ज्ञानेश्वर हिंगोलीकर

Supriya Sule News : महाराष्ट्रात येणारा वेदांता प्रकल्प (Vedanta Project) गुजरातला गेल्यावरुन राज्यातील राजकारण तापलं आहे. राज्यात दोन लाख कोटींची गुंतवणूक असणारा आणि दीड लाख जणांना रोजगार उपलब्ध करुन देणारा हा महत्वपूर्ण 'वेदांता' ग्रुपचा सेमीकंडक्टर व डिस्पले फॅब्रीकेशनचा प्रकल्प गुजरातमध्ये नेण्यात येणार आहे. याच 'वेदांता' प्रकल्पावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून राज्याला दुसरा मोठा प्रकल्प देण्याचे आश्वासन दिलं आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे.

'तुमचं मुख्यमंत्रिपद काही काळ अजित पवारांना द्या, आम्ही तुम्हाला त्यापेक्षा मोठ पद देऊ', असा उपरोधिक टोला सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.

Supriya sule and eknath shinde
State Government News : शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यात एका कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वेदांता प्रकल्पावरून टीका केली.

'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, यापेक्षा मोठा प्रकल्प राज्यासाठी देऊ. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, तुमचं मुख्यमंत्रिपद काही काळ अजित पवारांना द्या, आम्ही तुम्हाला त्यापेक्षा मोठं पद देऊ. चालेल का ?, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे .

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, 'मुख्यमंत्र्यांनी तातडीनं विमानात बसून दिल्लीत जावं आणि पंतप्रधान यांना विनंती करून हा प्रकल्प राज्यातच ठेवावा अशी विनंती करावी. उदय सामंत आधी महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते. हे खरं आहे ना ? त्यांना विस्मरण झालं असेल, मात्र मला तरी अजून नाही आहे. आताचे मुख्यमंत्री त्या काळी अडीच वर्षे आमच्यात होते आणि तेही शिवसेनेचे होते. हा निर्णय सेनेच्या मंत्र्यांनी घेतला ना ? विभाग तर त्यांच्याकडेच होतं ? मग...'.

Supriya sule and eknath shinde
Vedanta Foxconn : वेळ पडल्यास दिल्लीत जा पण..., 'वेदांता'वरून अजित पवारांचा शिंदेंना सल्ला

'सर्व पक्षांना विनंती आहे की हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे आणि अर्थकरणाचा आहे. सर्व राज्यकर्त्यांनी एकत्र येऊन केंद्रातील नेत्यांना भेटू हा प्रकल्प मेरिटवर राज्यातच राहिला पाहिजे यासाठी प्रयत्न केले पाहिजे', असेही त्या पुढे म्हणाल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com