Pune News
Pune NewsSaamtv

Pune News: येरवडा जेलमधील कैद्यांसाठी आनंदाची बातमी! आता महिन्यातून ३ वेळा घरी फोन करता येणार

Good News For prisoners In Yerwada Jail: कैद्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मानसिकेतच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
Published on

अक्षय बडवे, प्रतिनिधी...

Pune Yerwada Jail: पुण्यातील येरवडा तुरुंगातील कैद्यांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. येरवडा कारागृहात राहणाऱ्या या ठिकाणी असलेल्या कैद्यांना आता घरच्यांसोबत महिन्यातून ३ वेळा घरच्यांशी फोनवर बोलता येणार आहे. कैद्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मानसिकेतच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. (Pune Good News for prisoners and relatives for Yerwada Jail)

Pune News
Devendra Fadnavis News: 'विरोधी पक्षांची बैठक म्हणजे कुटुंब बचाव बैठक'; देवेंद्र फडणवीसांची जोरदार टीका

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील (Pune) येरवडा जेलमधील कैद्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण या ठिकाणी असलेल्या कैद्यांना आता घरच्यांसोबत महिन्यातून ३ वेळा घरच्यांशी फोनवर बोलता येणार आहे.

अपर पोलिस महासंचालक (कारागृह) अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते आज येरवडा कारागृहात स्मार्ट कार्ड फोन सुविधेच उद्घाटन करण्यात आले. कैद्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मानसिकेतच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून महिन्यातील ३ वेळा ही सुविधा उपलब्ध असेल. (Crime News)

Pune News
Buldhana News: २५ दिवसांपासून नळाला पाणी नाही; संतप्त महिलांचा ग्रामपंचायतवर घागर मोर्चा

पुण्यातील येरवडा कारागृहात (Yerwada Jail) सुरू करण्यात आलेल्या हा प्रायोगिक प्रकल्प जर यशस्वी झाला तर राज्यातील इतर कारागृहात हा सुरू करण्यात येईल. दरम्यान, याआधी  पुण्यातील येरवडा तुरुंगातील कैद्यांना त्यांच्या कुटुंबीयांसोबत व्हिडीओ कॉलवर बोलता येणार असल्याचे जाहीर केले होते. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com