Lavani Dancer : धक्कादायक! लोकप्रिय लावणी डान्सरचा अश्लिल व्हिडिओ व्हायरल; बदनामीचा डाव?

पुण्यात लावणी डान्सरच्या बदनामीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Lavani Dancer
Lavani Dancer Saam Tv

Lavni Dancer : राज्यत कायम चर्चेत असणाऱ्या एका लोकप्रिय लावणी डान्सरचा एक अश्लिल व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पुण्याच्या एका कार्यक्रमात कपडे बदलत असताना तिचा एका अज्ञात व्यक्तीने चोरून व्हिडिओ काढला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. ही लावणी डान्सर ही कायमच चर्चेत असते. तिच्या कार्यक्रमाला देखील मोठी गर्दी होत असते.

Lavani Dancer
Japan Earthquake : जपानमध्ये भूकंपाचे तीव्र झटके; होक्काइडोमधील नागरिक भयभीत

याविरोधात संपूर्ण महाराष्ट्रातुन संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. पुण्यातील (Pune) एका स्टेजशो दरम्यान कपडे बदलताना तिचा अश्लिल व्हिडिओ काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल केला जात आहे. वाढती लोकप्रियता पाहता आणि तिला बदनाम करण्यासाठी हा घृणास्पद प्रकार केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबत तिने भारती विद्यापीठ पोलीस (police) स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Lavani Dancer
Sanjay Raut : 'मराठी माणूस मेल्या आईचे दूध प्यायलेला नाही'; संजय राऊतांचा मोदी सरकारवर 'रोखठोक' हल्लाबोल

तिचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्याने समाजाकडून संतापाच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत असून तिला सपोर्ट करण्यासाठी देखील नेटकरी पुढे आले आहेत.

शेवटी माणूस आहे चुका तर होणारच की पण झालेली चूक सुधारताही आली पाहिजे तिला मागे ऑन कॅमेरा माफी वगैरे मागायला लावली होती आणि तिने खुल्या मनाने माफी ही मागितली. चुकली असेल तर तिला खडे बोल जरूर सुनवा परंतु कपडे बदलत असताना तिचा लपून काढलेला व्हिडिओ वायरल करुन आपली मर्दानगी दाखवू नका..

तर आणखी एका नेटकऱ्याने म्हंटले आहे, प्रसिद्धीच्या हव्यासापोटी तिचे हातवारे चुकले तसे तिने त्या चुकीची अनेकवेळा वारंवार माफी सुद्धा मागितली हे आपण बघितले आहे.तिच्या त्या चुकीला आजही आम्ही चूकच म्हणतो पण आपल्या कार्यक्रमाच्या सुपाऱ्या संपल्या म्हणून दुसऱ्याच्या इज्जतीचा बाजार करण्याच्या सुपाऱ्या देण्याची मानसिकता ही निंदनीय आहे. तिच्या चुकीसाठी तिला ट्रोल नक्कीच करा पण बंद दाराआड लपून एखाद्या स्त्रीचे कपडे बदलताना व्हिडीओ काढण आणि तो व्हिडिओ याला त्याला सेंड करणं या दोन्हीही वृत्ती नीचच आहेत.

अशा प्रकारच्या अनेक प्रतिक्रिया देत नेटकऱ्यांनी नृत्यांगनाच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओचा निषेध केला करून तिला पाठिंबा दिलाय. याशिवाय गुन्हेगारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com