MNS Pune Bank News
MNS Pune Bank NewsSaam Tv

MNS News : मनसेचा मराठी बाणा! व्यवहारात मराठी वापरा अन्यथा..., बँकांना थेट इशारा

Pune News : पुण्यामधील राष्ट्रीय तसेच खासगी बँकांमधील व्यवहारात मराठी भाषेचा वापर करण्यात यावा अशी मागणी मनसेने केली आहे. याची अंमलबजावणी केली नाही तर येत्या पंधरा दिवसात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
Published on

Pune News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पुण्यातील राष्ट्रीय व खासगी बँकांमध्ये मराठी भाषेचा वापर करण्यात यावा अशी मागणी होत आहे. या संदर्भात मनसे पदाधिकाऱ्यांनी बँकांना निवदेन केले आहे. याची अंमलबजावणी न केल्यास तीव्र आंदोलन करु असा इशाराही त्यांनी दिला आहे.

रिझर्व्ह बँकेने २०१४ मध्ये परिपत्रक काढले होते. या परिपत्रकाद्वारे खातेदारांना त्या-त्या राज्यातील भाषेनुसार सेवा द्यावी असे रिझर्व्ह बँकेने म्हटले होते. मराठी भाषा ही राजभाषा आहे, आपल्या राज्याची, महाराष्ट्राची अधिकृत भाषा आहे, तेव्हा तिचा वापर कामकाजात करावा अशी मागणी मनसेने केली आहे.

मनसेने पुणे शहर आणि परिसरातील राष्ट्रीय आणि खासगी बँकांमध्ये खातेदाराशी मराठी भाषेत संवाद साधावा, कागदपत्रे मराठीत असावीत आणि बँकिंग सेवा मराठी भाषेत उपलब्ध करुन द्यावी असे निवदेन पुण्यातील ९ बँकांना गुरुवारी (२३ जानेवारी) दिली आहे. जर या बँकांनी येत्या १५ दिवसांत याची अंमलबजावणी केली नाही तर त्यांच्याविरुद्ध आंदोलनाचा इशाराही मनसेकडून देण्यात आला आहे.

MNS Pune Bank News
Bomb Threat In Mumbai : मुंबईतील शाळेत बॉम्ब ठेवल्याची धमकी, अफझल गँगकडून धमकीचा ईमेल

महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून मराठी माणसांची, मराठी भाषेची गळाचेपी होत आहे. मराठी बोलणाऱ्यांवर परप्रांतीयांकडून अन्याय होत असल्याच्या अनेक घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी मुंब्रामध्ये मराठी बोलणाऱ्या तरुणाला अमराठी जमावाने त्रास दिला होता. कल्याणमध्ये परप्रांतीय नागरिकांकडून मराठी नागरिकाला मारहाण झाली होती.

MNS Pune Bank News
Pune Crime News: आधार, पासपोर्ट आणि बरंच काही..पुण्यात बांगलादेशी घुसखोराकडे बनावट कागदपत्रांचा ढीग

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com