Lavasa Landslide: लवासामध्ये दरड कोसळली, २ बंगले मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले; २ ते ४ जण बेपत्ता
Lavasa LandslideSaam Tv

Lavasa Landslide: लवासामध्ये दरड कोसळली, २ बंगले मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले; अनेकजण बेपत्ता

Landslide In Lavasa City : पुण्यातील लवासा हिल स्टेशनवर दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. दोन बंगल्यावर दरड कोसळली. या घटनेमध्ये २ ते ४ जण बेपत्ता झाले आहेत.
Published on

गोपाल मोटघरे, पिंपरी- चिंचवड

पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे पडल्याच्या, पूरस्थिती निर्माण झाल्याच्या तर भिंती कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. अशामध्ये पुण्यातील लवासा हिल स्टेशनवर दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. दोन बंगल्यावर दरड कोसळली. या घटनेमध्ये २ ते ४ जण बेपत्ता झाले आहेत. घटनेची माहिती जिल्हाच प्रशासनाला देण्यात आली आहे. पण अद्याप कोणीच घटनास्थळी आले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील लवासा हिल स्टेशन येथे दरड कोसळली. दरड कोसळल्यामुळे दोन बंगले मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले आहेत. या बंगल्यामध्ये राहणारे २ ते ४ जण बेपत्ता झाले असल्याची माहिती स्थानिक नागिरकांनी दिली. स्थानिक नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला याबाबत माहिती दिली. या घटनास्थळावरील फोटो आणि व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत.

Lavasa Landslide: लवासामध्ये दरड कोसळली, २ बंगले मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले; २ ते ४ जण बेपत्ता
Pune Rain Alert : पुण्यात रात्रभर अतिमुसळधार पाऊस, धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने वाढला; ताजी आकडेवारी समोर

पुणे जिल्ह्यात मागील २४ तासांत मुसळधार पाऊस पडला असून लवासा या ठिकाणी सर्वात जास्त म्हणजेच ४५३.५ मिली मिटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. या विक्रमी पावसाचा फटका लवासा हिल स्टेशन या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना बसला आहे. याठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Lavasa Landslide: लवासामध्ये दरड कोसळली, २ बंगले मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले; २ ते ४ जण बेपत्ता
Pune Rain News: पुण्यात पावसाची तुफान बॅटिंग; सिंहगड रोडवरील सोसायट्यांमध्ये शिरलं पाणी!

पुणे जिल्हाधिकारी आपत्ती व्यवस्थापन कक्षातून जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेत आहेत असं असलं तरी लवासा या ठिकाणी अजून पर्यंत प्रशासनाची कुठलीही मदत पोहचली नाही आहे. प्रशासनाचा एकही कर्मचारी घटनास्थळी नाही त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, पुण्यामध्ये पावसाचा हाहाकार आणि पूरस्थिती लक्षात घेता जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुण्यामध्ये आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अशामध्ये नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

Lavasa Landslide: लवासामध्ये दरड कोसळली, २ बंगले मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले; २ ते ४ जण बेपत्ता
Pune Rain News: मुसळधार पावसाने पुणेकरांचे हाल! टपरी हलवताना करंट लागून तिघांचा मृत्यू; ताम्हिणी घाटात दरड कोसळून १ ठार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com