Pooja Khedkar Case: पूजा खेडकरच्या अडचणी वाढणार, DOPT च्या नोटीसला उत्तर न दिल्याने होणार कारवाई?

Pooja Khedkar Problems Increase: पूजा खेडकर चौकशीसाठी हजर राहत नसल्यामुळे तिला आता डीओपीटीने शेवटची नोटीस बजावली आहे. पूजा खेडकरला चौकशीसाठी हजर राहण्यासाठी अनेक नोटीस पाठवण्यात आल्या. पण ती अद्याप चौकशीला हजर झाली नाही.
Pooja Khedkar Case: पूजा खेडकरच्या अडचणी वाढणार, DOPT च्या नोटीसला उत्तर न दिल्याने होणार कारवाई?
Pooja Khedkar CaseSaam Digital
Published On

वादग्रस्त आयएएस अधिकार पूजा खेडकर प्रकरणात (IAS Pooja Khedkar Case) मोठी अपडेट समोर आली आहे. पूजा खेडकरच्या अडचणीत आणखी वाढ आली आहे. पूजा खेडकर चौकशीसाठी हजर राहत नसल्यामुळे तिला आता डीओपीटीने (Department of Personnel & Training) शेवटची नोटीस बजावली आहे. पूजा खेडकरला चौकशीसाठी हजर राहण्यासाठी अनेक नोटीस पाठवण्यात आल्या. पण ती चौकशीसाठी हजर राहत नसल्याने आता डीओपीटीने अंतिम नोटीस पाठवून पूजा खेडकरला शेवटची संधी दिली आहे. आता चौकशीला हजर राहिले नाही तर तिला यापुढे कोणतेही स्पष्टीकरण देता येणार नाही. त्यामुळे पूजा खेडकरच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पूजा खेडकरला डीओपीटीने अंतिम नोटीस बजावली आहे. डीओपीटीने दिलेल्या नोटिसला पूजा खेडकरने पुन्हा एकदा कोणतेही उत्तर दिले नसल्याचे समोर आले आहे. विभागाने बजावलेल्या नोटिसनुसार तिला शुक्रवारची म्हणजे १६ ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आल्यानंतर देखील नोटिसला तिने प्रतिसाद दिलेला नाही. यापुढे तिला कोणतेही स्पष्टीकरण देता येणार नसल्याचे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. नोटीसला उत्तर न दिल्याने खेडकरच्या घरावर डीओपीटीकडून नोटीस लावण्यात आली आहे.

Pooja Khedkar Case: पूजा खेडकरच्या अडचणी वाढणार, DOPT च्या नोटीसला उत्तर न दिल्याने होणार कारवाई?
मोठी बातमी! पूजा खेडकरच नव्हे तर महाराष्ट्रासह देशात २२ बोगस IAS, IPS अधिकारी, धक्कादायक माहिती समोर

पूजा खेडकरने १२ वेळा यूपीएससीची परीक्षा देऊन केंद्रीय लोकसभा आयोगाची फसवणूक केली आहे. या फसवणुकीप्रकरणी डीओपीटीने स्पष्टीकरण मागितले होते. आपले म्हणणे सादर करण्यासाठी पूजा खेडकरला १६ ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली होती. पण तिने नोटीसला प्रतिसाद दिला नाही त्यामुळे तिला यापुढे कोणतेही स्पष्टीकरण देता येणार नाही. यासंदर्भात पूजा खेडकरच्या पुण्यातील दोन्ही बंगाल्यावर डीओपीटीने नोटीस लावल्या आहेत. आता पूजा खेडकरविरोधात काय कारवाई होणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.

Pooja Khedkar Case: पूजा खेडकरच्या अडचणी वाढणार, DOPT च्या नोटीसला उत्तर न दिल्याने होणार कारवाई?
Pooja Khedkar Case: पूजा खेडकरच्या कुटुंबीयांना दिलासा, कर भरल्याने 'त्या' कंपनीचा लिलाव टळला

दरम्यान, पूजा खेडकर सध्या नॉटरिचेबल आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून पूजा खेडकर गायब आहे. पुणे पोलीस, दिल्ली पोलीस, लोकसेवा आयोग आणि डीओपीटीने तिला चौकशीसाठी बोलावले होते. यासाठी तिला अनेक नोटीस देखील पाठवण्यात आल्या होत्या. पूजा खेडकर एकाही चौकशीसाठी हजर राहिली नाही. पूजा खेडकरने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता यावर सुनावणी करताना दिल्ली हायकोर्टाने पूजा खेडकरला तात्काळ अटक करणे आवश्यक नाही, असे सांगितले होते. याप्रकरणाची पुढील सुनावणी २१ ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यामुळे पूजा खेडकरला २१ ऑगस्टपर्यंत दिलासा मिळाला.

Pooja Khedkar Case: पूजा खेडकरच्या अडचणी वाढणार, DOPT च्या नोटीसला उत्तर न दिल्याने होणार कारवाई?
Pooja Khedkar News : पूजा खेडकर दुबईला पळून गेल्या का? पोलीस तपासात मोठी माहिती समोर, पाहा व्हिडिओ

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com