माजी प्रोबेशनरी आयएएस आधिकारी पुजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या विरोधात लिहलेले पत्र साम टीव्हीच्या हाती लागलं आहे. पत्रात पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर लैंगिग छळाचे आरोप नसल्याचं समोर आलं आहे. दिवसेंनी सातत्याने अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप, या पत्रात करण्यात आला आहे.
दिवसेंनी शासनाला पाठवलेला अहवाल व्हायरल झाल्याने बदनामी झाल्याचे पूजा खेडकर यांनी पत्रात म्हटलं आहे. अहवालामुळे मी उद्दाम आधिकारी असल्याची प्रतिमा निर्माण झाली. दिवसे यांनी पुण्यातून खेडकर यांची बदली करण्याची केलेली मागणी मान्य न करण्याची विनंती पत्रात करण्यात आली होती. बदली झाल्यास जममानसात आपणच दोषी असल्याची प्रतिमा तयार होईल, असं पूजा खेडकर याचं म्हणंणं होतं. सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिवांकडे पूजा खेडकर यांनी पत्र लिहून दिवसे यांच्या विरोधात तक्रार केली होती.
पूजा खेडकर यांनी युपीएसीची फसवणूक केल्याचे अनेक पुरावे समोर आले आहेत. त्यामुळे युपीएसीने गुन्हा दाखल केला आहे. तसंच त्यांची तात्पुरती नियुक्तीही रद्द केली असून, निर्दोष सुटका झाली तरचं त्यांना आता युपीएसीची परीक्षा देता येणार आहे. अन्यथा आयोगाच्या कोणत्याही परीक्षेला बसता येणार नाही. या प्रकरणादरम्यान पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवे यांच्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती.
पूजा खेडकर यांची वाशिम पोलिसांनी तक्रार नोंद केली होती. त्याविरोधात सुहास दिवसे यांनी पूजा खेडकरविरोधात अब्रूनुकसानीचा दाखल करणार असल्याचं म्हटलं होतं. दरम्यान पूजा खेडकर यांनी दिवसे यांच्याविरोधात लिहलेले पत्र साम टीव्हीच्या हाती लागलं आहे. पत्रात पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर लैंगिग छळाचे आरोप नसल्याचं समोर आलं आहे. दिवसेंनी सातत्याने अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप, या पत्रात करण्यात आला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.