

अक्षय बडवे
Pune News:
नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीतील डीजे आणि लेझर लाइटमुळे काही तरुणांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम झाले होते. काही तरुणांना एका डोळ्याने दिसण्यात गंभीर अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यानंतर पुण्यातही एका २३ वर्षीय तरुणाला एका डोळ्याने दिसेनासे झाले आहे. पुण्यात एक रुग्ण आढळ्यानंतर आणखी काही रुग्णांमध्ये त्याचे निदान होण्याची भीती व्यक्त होत आहे. (Latest Marathi News)
पुण्यातील गणेशोत्सवात नाचणाऱ्या अनिकेत शिगवण या 23 वर्षांच्या तरुणाच्या डोळ्यावर काही सेकंदांसाठी लेझरचा झोत पडला. त्यानंतर त्याला एका डोळ्याने दिसेनासे झाले. त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्याची दृष्टी पूर्वीसारखी होणं शक्य नसल्याचं म्हटलंय. त्यामुळे लेझर किती धोकादायक ठरु शकतात हे दिसून आलं आहे.
पुण्यातील गणेश विसर्जनाच्या दिवशी संध्याकाळी लक्ष्मी रोड आणि टिळक रस्त्यावर 100 डेसिबलपेक्षा अधिक आवाजात डीजे वाजवला गेला. यामुळे अनेकांचा थरकाप उडत होता. डीजेच्या आवाजाचा त्रास लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना होत होता. या डीजेच्या आवाजामुळे आणि लेझर लाईटमुळे काय त्रास होतो हे नेत्रतज्ज्ञ डॉ अनिल दुधभते यांनी आज पत्रकार परिषद घेत माहिती दिली.
नेत्रतज्ज्ञ डॉ. अनिल दुधभाते म्हणाले की, 'लेझरचा परिणाम एका तरुणाच्या डोळ्यावरील रेटिनावर रक्तस्राव झाला आहे. त्यामुळे त्याच्या डोळ्यावर गंभीर परिणाम झाला आहे. लेझरचा अंश त्याच्या डोळ्यात गेल्यामुळे त्याच्या डोळ्यावर गंभीर परिणाम झाला आहे. या लेझरचा वापर करताना नियम आणि अटी शासनाने लावले पाहिजेत'.
'माझ्याकडे आलेल्या रुग्णाला सुरवातीला ७ दिवसांसाठी ड्रॉप दिला आहे. या ७ दिवसांच्या ड्रॉपनंतर शस्त्रक्रियाचा विचार करणार आहे. या शस्त्रक्रियेनंतरही पहिल्या सारखी दृष्टी होण्याची शक्यता कमी आहे. या लेझरसंबंधी मी सरकारशी पत्रव्यवहार करणार आहे. शासनाने या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घातलं पाहिजे, असेही ते म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.