सचिन जाधव
पुणे : समाजमाध्यमातील अनेक उच्चपदस्थ तसेच सामान्यांची सोशल मीडियावरील खाती सायबर चोरट्यांकडून हॅक केली जात आहेत. यात आता (Pune) पुणे पोलीस दलातील गुन्हे शाखेचे अतिरिक्त (Police) पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांचे समाज माध्यमातील खाते हॅक करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. (Latest Marathi News)
पुणे शहरात ऑनलाइन टास्कच्या आमिषाने फसवणुकीच्या घटना वाढत आहेत. समाज माध्यमात मैत्रीची विनंती पाठवून चोरटे नागरिकांची फसवणूक (Cyber Crime) करतात. अशाच प्रकारे सायबर चोरट्यांनी गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पोकळे यांचे समाज माध्यमातील खाते हॅक केल्याचा प्रकार उघडकीस आला.
नागरिकांना केले आवाहन
रामनाथ पोकळे यांच्या नावाने काही परिचित (Pune Police) नागरिकांनी चोरट्यांनी मैत्रीची विनंती पाठविल्याचे उघडकीस आले आहे. खाते हॅक केल्यानंतर चोरटे संदेश पाठवून नागरिकांची फसवणूक करु शकतात. त्यामुळे चोरट्यांनी पाठविलेल्या संदेशाकडे दुर्लक्ष करावे; असे आवाहन पोकळे यांनी केले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.