Loksabha Election 2024: अमोल कोल्हेंसमोर उमेदवार शोधताना महायुतीची दमछाक, उमेदवार आयात करण्याची वेळ येण्याची शक्यता

Maharashtra Politics: महायुतीत शिरुर लोकसभा कोण लढवणार? यावर एकमत होत नसल्याने कोल्हेंसमोर प्रभावी उमेदवार शोधताना महायुतीची दमछाक होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
Amol Kolhe vs Ajit pawar
Amol Kolhe vs Ajit pawarSaamtv
Published On

Shirur Loksabha Election 2024:

शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे यांना पाडणार म्हणजे पाडणार असे थेट आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. कोल्हेंना आव्हान दिल्यानंतर अजित पवार शिरुर मतदार संघात चांगलेच सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र महायुतीत शिरुर लोकसभा कोण लढवणार? यावर एकमत होत नसल्याने कोल्हेंसमोर प्रभावी उमेदवार शोधताना महायुतीची दमछाक होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्रामध्ये पक्ष न पाहता निवडून येईल त्या उमेदवाराला संधी द्यायची असे महायुतीमध्ये ठरले आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुणे ग्रामीणमधील बारामती लोकसभा (Baramati) व शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीतील पारंपारिक जागांची खांदेपालट होणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. नवीन संकेतानुसार बारामतीची मूळची भाजपकडे असणारी जागा आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार आहे.

तर शिरूर लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या वतीने जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद यांच्या नावावरती पक्षश्रेष्ठी विचार करत असल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये राष्ट्रवादीचे अमोल कोल्हेंविरुद्ध भाजपाचे प्रदीप कंद असा सामना लोकसभा निवडणुकीसाठी रंगणार असल्याचे संकेत मिळत आहेत. प्रदीप कंद यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे शिरुरसाठी आता प्रदीप कंद यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Amol Kolhe vs Ajit pawar
Budget Session: फसवणूक नको, आरक्षण द्या; अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक, सरकारविरोधात घोषणाबाजी

दरम्यान, शिरुर लोकसभा मतदारसंघाचे सलग ३ वेळा प्रतिनिधीत्व करणारे शिवाजीराव आढळराव पाटील यांना महायुती सरकारने नुकतेच म्हाडाचे अध्यक्षपद दिले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी आढळरावांना हे पद मिळाल्याने याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. संभाव्य उमेदवार प्रदीप कंद हे लोणीकंद गावचे रहिवासी असून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. (Latest Marathi News)

Amol Kolhe vs Ajit pawar
Farmer Protest : शेतकरी कर्मचाऱ्यांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार; विविध मागण्यांवर शेतकरी ठाम

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com