मयुर राणे, मुंबई|ता. २६ फेब्रुवारी २०२४
भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेना ठाकरे गटावर टीका करताना पक्ष गेला, चिन्ह गेले, खासदार, आमदार, कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक गेले असे म्हणत ठाकरे गटाची अखेरची घरघर सुरू असल्याचा घणाघात केला होता. आशिष शेलार यांच्या या टीकेला उत्तर देताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
पवार आणि शिंदे गटाच्या भरवश्यावर भारतीय जनता पक्ष आहे. स्वतःच्या हिंमतीवर निवडून येण्याची क्षमता असती तर अशी पक्ष फोडून अपवित्र युती केली नसती. आशिष शेलार काय सांगतात. भारतीय जनता पक्षात सध्या टोळीयुद्ध सुरू आहे आणि त्या टोळीयुद्धाचा लवकरच भडका होणार, असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला.
"मनोज जरांगे यांच्या पाठीमागे कोण आहे, हे फडणवीसांनी सांगांवे. यासंदर्भात राज्याच्या गृहमंत्र्यांकडे माहिती नसेल तर हे राज्याचे दुर्दैव आहे. जरांगे पाटील हे साधे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या भावना समजून घ्या. त्यांनी भाजपची भाषा शिकली असावी. भाजपनेच भाषेची संस्कृती अन् संस्कार बिघडवले. हा महाराष्ट्र सुसंस्कृत आणि संस्कारी होता. फडणवीसांकडे (Devendra Fadanvis) राज्य गेल्यापासून भाजपची संस्कृती बिघडली," अशी टीकाही संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली.
इंडिया आघाडीचा फॉर्म्युला ठरला..
"देशभरामध्ये इंडिया आघाडीचा फॉर्मुला जवळजवळ निश्चित झाला महाराष्ट्रामध्ये उद्या बैठक आहे. शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडी आम्ही एकत्र बसून दोन दिवसात अंतिम मसुदा तयार करू. आमची मशाल आणि तुतारी आणि हात याच मनोमिलन आहे आणि वंचित बहुजन आघाडी आमच्यासोबत आहे यांची जर तुम्हाला भीती वाटत असेल तर तुम्ही आत्ताच राजकारणातून निवृत्त व्हा," असा टोलाही राऊतांनी लगावला. (Latest Marathi News)
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.