मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. फडणवीस माझ्याविरोधात कटकास्थान रचत असून मला सलाईमधून विष देण्याचा प्रयत्न केला जातोय, असं जरांगे यांनी म्हटलंय. इतकंच नाही, तर मी मुंबईतल्या सागर बंगल्यावर जाणार अशा इशाराही त्यांनी दिला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दरम्यान, जरांगे मुंबईत येण्याआधीच जालन्यात सोमवारी (२६ फेब्रुवारी) पहाटे अचानक पोलीस धडकले. त्यांनी जरांगे यांच्या तीन कट्टर समर्थकांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. शैलेंद्र पवार, बाळासाहेब इंगळे आणि शिवबा संघटनेचे श्रीराम कुरणकर असं ताब्यात घेण्यात आलेल्या जरांगेंच्या सहकाऱ्यांची नावे आहेत. (Latest Marathi News)
प्राप्त माहितीनुसार, शैलेंद्र पवार हे तीर्थपुरी तर, बाळासाहेब इंगळे घनसावंगी येथील रहिवासी आहेत. दोघेही जरांगेंचे (Manoj Jarange Patil) कट्टर समर्थक असून ते आंदोलन सुरू झाल्यापासून सातत्याने त्यांच्यासोबत आहेत. मनोज जरांगेंनी सागर बंगल्यावर येण्याचा इशारा दिल्यानंतर दोघेही मुंबईला जाण्यासाठी तयारी करीत होते.
मात्र, पोलिसांनी सोमवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास दोघांनाही ताब्यात घेतलंय. पोलिसांच्या या कारवाईमुळे मराठा आंदोलक आक्रमक होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, जरांगे मुंबईत येण्याआधी सागर बंगल्यावरील पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे.
दरम्यान, राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याची आमची जबाबदारी असून सर्वांनी संयम पाळावा, कुणीही कायदा हातात घेऊ नये. संभ्रम निर्माण करण्याचा किंवा सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.
Edited by - Satish Daud-Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.