Maharashtra Politics: 'तुतारी'चा भाजपला पुन्हा 'दे धक्का'! माजी आमदाराचा शरद पवार गटात प्रवेश; सुनिल टिंगरेंच्या विरोधात शड्डू ठोकणार

Maharashtra Assembly Election 2024 Political Updates in Marathi: गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार बापूसाहेब पठारे हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. गणेशोत्सव कार्यक्रमामध्ये बोलताना बापूसाहेब पठारे यांनी विधानसभा लढवणार असल्याचे म्हटले होते.
Maharashtra Politics: 'तुतारी'चा भाजपला पुन्हा 'दे धक्का'! माजी आमदाराचा शरद पवार गटात प्रवेश; सुनिल टिंगरेंच्या विरोधात शड्डू ठोकणार
Sharad Pawar, Devendra FadnavisSAAM TV
Published On

Bapusaheb Pathare Join NCP Sharad Pawar: विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्याने राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाने जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली असून महायुतीमधील अनेक दिग्गज नेते तुतारी हाती घेत आहेत. अशातच पुण्यामध्ये महायुतीला मोठा धक्का बसला असून भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला आहे.

Maharashtra Politics: 'तुतारी'चा भाजपला पुन्हा 'दे धक्का'! माजी आमदाराचा शरद पवार गटात प्रवेश; सुनिल टिंगरेंच्या विरोधात शड्डू ठोकणार
Maharashtra Politics: आमदार अपात्रता प्रकरणावर आज 'सर्वोच्च' सुनावणी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा आज फैसला होणार?

गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार बापूसाहेब पठारे हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. गणेशोत्सव कार्यक्रमामध्ये बोलताना बापूसाहेब पठारे यांनी विधानसभा लढवणार असल्याचे म्हटले होते. तसेच तुतारीला मतदान करा, असे आवाहनही त्यांनी केले होते. पठारे यांच्या या आवाहनानंतर ते लवकरच भाजपची साथ सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जातील असे बोलले जात होते.

अखेर यावर शिक्कामोर्तब झाले असून माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी त्यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे व तीन माजी नगरसेवकांसह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Maharashtra Politics: 'तुतारी'चा भाजपला पुन्हा 'दे धक्का'! माजी आमदाराचा शरद पवार गटात प्रवेश; सुनिल टिंगरेंच्या विरोधात शड्डू ठोकणार
Kalyan Crime : धक्कादायक! दिव्यांग दाम्पत्याच्या बाळाला विकण्याचा डाव; डॉक्टरचं कृत्य उघडकीस, कल्याणमधील खळबळजनक घटना

बापूसाहेब पठारे हे पुण्यातील वडगाव- शेरी मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. २००९ मध्ये ते राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आले होते. त्यानंतर २०१४ मध्ये भाजपच्या जगदीश मुळीक यांनी त्यांचा पराभव केला. अंतर्गत गटबाजीतून पराभव झाल्याचा आरोप करत पठारे यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता. मात्र २०२९ मध्ये भाजपने पुन्हा जगदीश मुळीक यांना तिकीट दिले मात्र त्यांचा राष्ट्रवादीच्या सुनिल टिंगरे यांनी पराभव केला.

दरम्यान, आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर बापूसाहेब पठारे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने ते विधानसभेच्या रिंगणात उतरणार हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे वडगाव- शेरी मतदार संघामध्ये तुतारीविरुद्ध घड्याळ असा हायहोल्टेज सामना पाहायला मिळणार आहे.

Maharashtra Politics: 'तुतारी'चा भाजपला पुन्हा 'दे धक्का'! माजी आमदाराचा शरद पवार गटात प्रवेश; सुनिल टिंगरेंच्या विरोधात शड्डू ठोकणार
Ganpati Visarjan 2024: दिवस उजाडताच 'डी. जे'चा दणका! मुंबई, पुण्यात विसर्जन मिरवणुका अद्यापही सुरु; १८ तासांनी लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com