Pune News: कोथरूडमधील ५४ डुकरांच्या मृत्यूचं गूढ उकललं, शवविच्छेदनातून धक्कादायक कारण आलं समोर

Kothrud Pig Deaths Update: कोथरूड परिसरात सातत्याने डुकरांचा मृत्यू होण्यामागचं कारण अखेर समोर आले आहे. या डुकरांवर विषप्रयोग करण्यात आल्याचे त्यांच्या शवविच्छेदनातून उघड झाले आहे. सध्या पालिका प्रशासनाकडून तपासणी सुरू आहे.
Pune News: कोथरूडमधील ५४ डुकरांच्या मृत्यूचं गूढ उकललं, शवविच्छेदनातून धक्कादायक कारण आलं समोर
Kothrud Pig DeathsSaam Tv
Published On

सागर आव्हाड, पुणे

पुण्यातल्या कोथरूड परिसरात होणाऱ्या डुकरांच्या मृत्यूचं गूढ अखेर उकललं आहे. मृत डुकरांच्या शवविच्छेदनातून त्यांच्या मृत्यू मागचं खरं कारण समोर आलं आहे. कोथरूड परिसरामध्ये डुकरांवर विषप्रयोग झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली. डुकरांच्या रक्त नमुन्यांचीही सध्या तपासणी सुरू आहे.

कोथरूड परिसरात सातत्याने डुकरांचा मृत्यू होण्यामागचं कारण अखेर समोर आले आहे. या डुकरांवर विषप्रयोग करण्यात आल्याचे त्यांच्या शवविच्छेदनातून उघड झाले आहे. या प्रकरणी महापालिकेच्या आरोग्य विभागाने भरारी पथक नेमले असून ते परिसरात तपासणी करीत आहे. या परिसरामधील इतर डुकरांना सध्या विलनीकरणात ठेवले आहे.

Pune News: कोथरूडमधील ५४ डुकरांच्या मृत्यूचं गूढ उकललं, शवविच्छेदनातून धक्कादायक कारण आलं समोर
Pune Pet Cat : एका फ्लॅटमध्ये 350 मांजरी; महिलेचा प्रताप, दुर्गंधीमुळे रहिवाशांचा संताप, पाहा स्पेशल रिपोर्ट

कोथरूडमध्ये भारती नगर नाला आणि भिमाले कॉर्नर परिसरात ६ फेब्रुवारीपासून मृत डुकरे आढळून येत आहेत. आतापर्यंत या परिसरात ५४ मृत डुकरे आढळली आहेत. यातील एका डुकराचे शवविच्छेदन करण्यात आले. पशुसंवर्धन विभागाच्या रोग नियंत्रण केंद्राने या डुकराच्या अवयवांची तपासणी केली. डुकराच्या अवयवांमध्ये कार्बामेट हे विष आढळून आले. त्यामुळे या डुकरांवर विषप्रयोग झाला असल्याचे सांगितले जात आहे.

Pune News: कोथरूडमधील ५४ डुकरांच्या मृत्यूचं गूढ उकललं, शवविच्छेदनातून धक्कादायक कारण आलं समोर
Pune Accident : कल्याणीनगरमध्ये पुन्हा दोघांना उडवले, एकाचा मृत्यू, चालक फरार

पुण्यात कोथरुड परिसरात डुकरांच्या मृत्यूचे सत्र गेल्या काही दिवसांपासून सुरूच आहे. गेल्या दोन दिवसांत आणखी १५ डुकरांचा मृत्यू झाला. मृत डुकरांची संख्या ५४ वर पोहचली आहे. सध्या महापालिकेकडून उपाययोजना केल्या जात आहेत. गेल्या १५ दिवसांपासून कोथरूडमधील भारतीनगर नाला, भिमाले कॉर्नर, कचरा रॅम्प या परिसरात वारंवार मृत डुकरे सापडत आहेत. त्यामुळे कोथरुड परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. याठिकाणच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Pune News: कोथरूडमधील ५४ डुकरांच्या मृत्यूचं गूढ उकललं, शवविच्छेदनातून धक्कादायक कारण आलं समोर
Pune Bailgada Race : आलो ज्या मातीत, निधड्या छातीनं; बैलगाडा शर्यतीत आजोबांचा जलवा, कोलांटउड्या अन् दंड थोपटत जल्लोष

डुकरांच्या मृत्यूचे कारणही पुढे येत नव्हते. या प्रकरणाची दखल राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने घेत विभागाच्या अधिकाऱ्यांनी भारतीनगर परिसरात पाहणी केली होती. कोथरुड कचरा डेपो येथे मृत डुकरांचे त्वरीत शवविच्छेदन करण्यात आले. त्यावेळी कावळी सदृश्‍य आजारामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे उघड झाले होते. मात्र आता डुकरांच्या मृत्यूचे खरं कारण समोर आले आहे. डुकरांवर विष प्रयोग झाल्याचे शवविच्छेदनातून स्पष्ट झाले आहे.

Pune News: कोथरूडमधील ५४ डुकरांच्या मृत्यूचं गूढ उकललं, शवविच्छेदनातून धक्कादायक कारण आलं समोर
Mumbai-Pune Tourist Spots : मुंबई पुणे जवळील 'या' स्वर्गसुंदर हिल स्टेशनवर फिरायला गेलात का?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com