Pune Pet Cat : एका फ्लॅटमध्ये 350 मांजरी; महिलेचा प्रताप, दुर्गंधीमुळे रहिवाशांचा संताप, पाहा स्पेशल रिपोर्ट

...कधीपासून आहेत या मांजरी? एकाच फ्लॅटमध्ये एवढ्या मांजरी ठेवण्यामागचं गूढ काय? पाहूयात यावरचा विशेष रिपोर्ट
Pune Cat News
Pune News Saam Tv
Published On

रात्रीचा अंधार आणि शेकडो मांजरींच्या टोळीचा म्याव म्याव आवाज.... या आवाजाने अनेकांची भीतीने गाळण उडेल... मात्र हा प्रसंग कुणाच्या स्वप्नातला नाही.. तर पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीत हा धक्कादायक प्रकार गेल्या पाच वर्षांपासून सुरू आहे. पुण्यातल्या हडपसरमधील मार्व्हल बाऊंट्री सोसायटीत एका महिलेने घरात तब्बल साडेतीनशे मांजरी पाळल्या आहेत....तर मांजरींच्या दुर्गंधीमुळे तब्बल 1 हजार रहिवाशांच्या आरोग्य संकटात आहे.

Pune Cat News
Pune Accident : कल्याणीनगरमध्ये पुन्हा दोघांना उडवले, एकाचा मृत्यू, चालक फरार

एवढंच नव्हे तर या मांजरींची काळजी घेण्यासाठी या महिलेनं चक्क केअर टेकरही ठेवलीय. या फ्लॅटमध्ये येणारी ही केअर टेकर या मांजरींबाबत काय म्हणते ते पाहूयात...

यासंदर्भात साम टीव्हीने वृत्त दाखवताच प्रशासन खडबडून जागं झालंय...महापालिकेनं चौकशी करण्यासाठी थेट महिला अधिकाऱ्याला सोसायटीत पाठवलं...

मात्र या मांजरींची दुर्गंधी सहन न झाल्याने महिला अधिकऱ्याची तब्बेतच बिङघडली....त्यानंतर पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली,....प्रशासनानं दखल घेतल्यामुळे रहिवाशांनी साम टीव्हीचे आभार मानले.

Pune Cat News
Aaditya Thackeray : BMC साठी तुम्ही काय विचार केलाय? आदित्य ठाकरेंनी सांगितला मेगाप्लॅन

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाही जर मांजरींची दुर्गंधी सहन होत नसेल तर महापालिकेला मांजरींबाबत कारवाई करण्यासाठी आणखी कोणता पुरावा हवाय. आता पोलीस प्रशासनाने कारवाईला सुरुवात केली असली तर महापालिका मात्र या मांजरींना दुसरीकडे कधी हलवणार आणि नागरिक कधी शुद्ध हवेतला मोकळा श्वास घेणार याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com