
Karnataka Mysuru : कर्नाटकच्या म्हैसूरमध्ये सोमवारी खळबळजनक घटना घडली आहे. एका अपार्टमेंटमध्ये एकाच कुटुंबातील चार जणाचे मृतदेह आढळले. त्यामध्ये नवरा-बायको, मुलगा अन् ६२ वर्षीय महिलेचा समावेश आहे. हत्या की आत्महत्या याचा पोलीस तपास करत आहेत. प्राथमिक तपासातून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
म्हैसूरमधील विश्वेरैया नगरमधील एका अपार्टमेंटमध्ये सोमवारी सकाळी एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह आढळले. मृतामध्ये व्यवसायिकाचा समावेश आहे. चेतन (४५ वर्ष), पत्नी रूपाली (४३ वर्ष), मुलगा कुशाल (१५ वर्ष),चेतन यांची आई प्रियंवदा (६२ वर्षे) अशी मृताची नावे आहेत. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून चौकशीला सुरूवात केली आहे. पोलिसांनी कुटुंबातील लोकांची आणि परिसरातील लोकांचा जबाब घेतला जातोय.
पहाटे ४ वाजता फोन केला, अन् -
स्थानिक मिडिया रिपोर्ट्सनुसार, चेतन यांनी जीव देण्याआधी पहाटे ४ वाजता भाऊ भरतला फोन केला होता. भरत अमेरिकेत राहतो, त्याच्यासोबत चेतन याचं आत्महत्याआधी खूपवेळ बोलणं झाले. त्यावेळी चेतन याने भरत याला आयुष्य संपवणार असल्याचे सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतन याने भावासोबतचा फोन कट करण्याआधी आम्ही आत्महत्या करण्यासाठी जात आहोत, असे सांगितले होते. पोलिसांच्या मते चेतन यानं गळफास घेण्याआधी कुटुंबातील सदस्यांना विष दिले होते.
पोलिसांनी सांगितले की, चेतन यानं फोनवर भरत याला आत्महत्या करणार असल्याचे सांगितले. फोन बंद झाल्यानंतर भरत याने तात्काळ चेतनच्या सासुरवाडीला याबाबत सांगितले. चेतन याच्या सासुरवाडीतील लोक विश्वेश्वरैया नगरमधील अपार्टमेंटमध्ये पोहचले, पण तोपर्यंत चेतन आणि कुटुंबाने जीव दिला होता. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.