Pune : पुणे महापालिकेतील तब्बल ४०७ जणांच्या एकाचवेळी अचानक बदल्या, बड्या अधिकाऱ्यांचा समावेश, कारण काय?

Pune Municipal Corporation : पुणे महानगरपालिकेत एकाच वेळी ४०७ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या मध्यरात्री बदल्या करण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. समुपदेशन प्रक्रिया न राबवता बदली आदेश काढल्याचा आरोप होत आहे.
PMC 407 employee transfer latest news
PMC 407 employee transfer latest news Saam
Published On

PMC 407 employee transfer latest news : पुणे महानगरपालिकेत (Pune Municipal Corporation - PMC) एकाच वेळी तब्बल ४०७ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या अचानक बदल्या करण्यात आल्याने पालिका प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. मतदार यादी पुनर्परीक्षण मोहिमेचे (SIR Work) कारण पुढे करत कर्मचाऱ्यांना तक्रार किंवा दाद मागण्यासाठी वेळच मिळू नये, अशा 'टायमिंग'वर मध्यरात्री हे आदेश जारी करण्यात आले. शासन नियमांना बगल देत, कोणतीही समुपदेशन फेरी (Counseling Session) न घेता थेट बदल्यांचा धसका दिल्याने कर्मचारी वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

शासकीय नियमांनुसार महापालिकेत बदल्या करताना कर्मचाऱ्यांची 'समुपदेशन फेरी' (Counseling Round) आयोजित करणे बंधनकारक असते. याद्वारे कर्मचाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेऊन परस्पर सहमतीने बदल्या केल्या जातात. मात्र, या वेळी उपायुक्त किशोरी शिंदे आणि अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी समुपदेशनाची प्रक्रिया पूर्णपणे टाळून थेट बदल्यांचे आदेश (Transfer Orders) जारी केले. २९५ कनिष्ठ लिपिक, १०० वरिष्ठ लिपिक आणि १२ उपअधीक्षक अशा एकूण ४०७ जणांच्या बदल्यांचे आदेश रात्री अचानक काढण्यात आले.

PMC 407 employee transfer latest news
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! 'या' दिवशी खात्यात जमा होणार ₹१५००; जुलैच्या हप्त्याची संभाव्य तारीख समोर

सध्या महापालिकेतील बहुतांश कर्मचारी हे 'मतदार यादी पुनर्परीक्षण मोहिमेच्या' (SIR Duty) कामात अत्यंत व्यस्त आहेत. ८ ऑगस्टनंतर या बदल्या होतील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, एसआयआरचे (SIR) काम सोडून कर्मचाऱ्यांना वरिष्ठांकडे किंवा लोकप्रतिनिधींकडे तक्रार मांडायला वेळच मिळू नये, यासाठी प्रशासनाने हीच वेळ साधल्याची चर्चा आहे. एसआयआरच्या कामात हलगर्जीपणा केल्यास कारवाईचा इशारा असल्याने अनेक कर्मचाऱ्यांना नाईलाजाने या बदल्यांचा स्वीकार करावा लागत आहे.

PMC 407 employee transfer latest news
Maharashtra infrastructure : केंद्र सरकारचं महाराष्ट्राला मोठं गिफ्ट, तब्बल ७ हजार २२ कोटींचा दिला अतिरिक्त निधी

या अचानक झालेल्या बदल्यांमुळे प्रशासकीय कारभारावर आणि पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ज्या कर्मचाऱ्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला नव्हता, त्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. जे कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून एकाच विभागात ठाण मांडून होते, त्यांना पुन्हा त्याच खात्यात सोयीस्कर नियुक्ती देण्यात आली आहे. बदल्यांमध्ये शहराच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकावर नियुक्ती मिळाल्याने विशेषतः महिला कर्मचाऱ्यांना रोजच्या लांबच्या प्रवासाचा मोठा फटका बसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com