पुणे महापालिकेच्या १८ हजार कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसचा निर्णय; दरवर्षी होणार दोन हजारांची वाढ

PMC Diwali bonus : पुणे महानगरपालिकेतील १८ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन करारानुसार बोनसच्या रकमेत दरवर्षी दोन हजार रुपयांची वाढ होणार आहेत.
Pune Municipal Corporation Diwali bonus annual increase details
Pune Municipal Corporation Diwali bonus annual increase details saam tv
Published On: 

अक्षय बडवे, पुणे

पुणे महानगरपालिकेतील सुमारे १८ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्या पक्षनेता बैठकीत अधिकारी व कर्मचाऱ्यांना बोनस देण्याच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून, महापौर मंजूषा नागपुरे यांनी याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे. या निर्णयामुळे महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

यावर्षीपासून लागू होणाऱ्या या नवीन करारानुसार, बोनसच्या रकमेत दरवर्षी दोन हजार रुपयांची वाढ केली जाणार आहे. हा करार आगामी पाच वर्षांसाठी असणार आहे. त्यानुसार, चालू वर्षी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी २७ हजार रुपये अतिरिक्त रक्कम मिळणार असून, २०२९-३० पर्यंत हा बोनस ३५ हजार रुपयांवर पोहोचणार आहे.

Pune Municipal Corporation Diwali bonus annual increase details
PM Kisan Yojana : राज्यातील ९१ लाख शेतकऱ्यांना मिळाले पैसे; पण कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही २००० रुपयांचा हप्ता?

नवीन कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा

या निर्णयाचे वैशिष्ट म्हणजे, महापालिकेत नवीन भरती झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी असणारी एक वर्ष सेवा पूर्ण करण्याची अट शिथिल करण्यात आली आहे. यापुढे ज्या कर्मचाऱ्यांनी १८० दिवस प्रत्यक्ष काम पूर्ण केले आहे, त्यांनाही बोनस मिळण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे, ज्यामुळे तरुण कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

Pune Municipal Corporation Diwali bonus annual increase details
BEST Employees : मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी जोरात! ३ नोव्हेंबरला पगारासह मिळणार इतका बोनस

कोणाला मिळणार लाभ?

महापालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी, रोजंदारी कामगार, माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभागातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षण मंडळातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, बालवाडी शिक्षिका आणि सेविका या सर्व घटकांचा समावेश करण्यात आला आहे. ऐन सणासुदीच्या काळात महापालिकेने घेतलेल्या या निर्णयामुळे हजारो कर्मचाऱ्यांचा सण उत्साहात साजरा होणार असून, प्रशासनाच्या या भूमिकेचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.