Pune OSD attempt to murder wife case details : पुण्यात कॅबिनेट मंत्र्याच्या खासगी स्विय सहाय्यकाने (OSD) पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकेच नाही तर भांडण सोडवण्यासाठी आलेल्या स्वतःच्या मुलालाही त्यान बॅटने बेदम मारहाण केली. जखमी पत्नीवर पुण्यातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. मंत्र्याच्या ओएसडीने केलेल्या या कृत्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. विजय कारंडे असे कॅबिनेट मंत्र्याचा खासगी स्विय सहाय्यक असल्याची माहिती आहे
या प्रकरणात अहिल्यानगरमध्ये गुन्हा दाखल झाला होता. तो आता पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, विजय कारंडे याने मुलाला देखील बॅटने मारहाण केली असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेत महिला जखमी झाली असून, तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना पुणे स्टेशन परिसरातील क्वीन्स गार्डन येथे घडली.
याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात विजय कारंडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या मारहाणीत ३० वर्षीय पत्नी आणि त्यांचा मुलगा जखमी झाला आहे. याबाबत पत्नीने तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना ३० एप्रिल रोजी पुण्यातील क्वीन्स गार्डन येथील त्यांच्या राहत्या घरी घडली. धक्कादायक म्हणजे, पती मोबाईलवर बोलत असताना त्याबाबत विचारल्यावरून हा प्रकार घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
अधिक माहितीनुसार, घरी असताना मोबाइलवर चॅटींग करत होता, पत्नीने पाहिल्यानंतर पत्नीने त्यांना याबाबत विचारले. या गोष्टीचा राग आल्याने त्यांनी पत्नीला शिवीगाळ करायला सुरुवात केली. तसेच मध्ये आलेल्या मुलाला सुद्धा चक्क बॅटने मारहाण केली. यावरच न थांबता त्यांनी पत्नीचा गळा आवळून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. पत्नीवर रुग्णालयावर उपचार सुरू असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.