

नाशिकनंतर पुणे हादरले
ऑफिस बॉयकडून अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार
पुणे पोलिसांनी ठोकल्या ऑफिस बॉयला बेड्या
नाशिकनंतर आता पुण्यातून धक्कादायक घटना उघडीस आली आहे. पुण्यात खासगी कोचिंग क्लासमध्ये आठवीतल्या मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कोचिंग क्लासच्या ऑफिस बॉयने मुलाला स्टोअर रूममध्ये नेऊन लैंगिक छळ केल्याचा समोर आलं आहे. मार्कट यार्ड परिसरातील या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी ऑफिस बॉयला अटक केली असून कडक कारवाईची मागणी केली जात आहे.
खासगी कोचिंग क्लासमधील ३५ वर्षीय ऑफिस बॉयने हे संतापजनक कृत्य केलं आहे. नराधमाने मुलाच्या प्रायव्हेट पार्टचे फोटोही काढले आहेत. पोलिसांनी त्याच्या विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे. इयत्ता आठवीतला मुलगा मार्केट यार्ड परिसरात असलेल्या एका कोचिंग क्लासमध्ये शिक्षण घेत होता.
पीडित मुलगा हा मागील दोन ते तीन वर्षांपासून या कोचिंग क्लासमध्ये जात होता. याच क्लासमधील ऑफिस बॉयने आठवीत शिक्षण घेत असलेल्या मुलाला शोरूममध्ये घेऊन गेला. त्यानंतर त्याला अनैसर्गिक स्पर्श करायला सुरुवात केली. नराधमाने मुलाच्या प्रायव्हेट पार्टचे फोटो देखील काढले.
आठवतील या पीडित मुलाने सगळा प्रकार घरी जाऊन आई-वडिलांजवळ रडू लागला. त्याने क्लासला जायला नकार दिल्याने वडिलांनी सगळी शहानिशा केली. मुलाच्या क्लासमध्ये जाऊन विचारपूस केली. पुढे मुलानेच हा सगळा प्रकार आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर आई-वडिलांनी थेट पोलिसात तक्रार दाखल केली. मुलासोबत जानेवारी महिन्यापासून सगळा प्रकार सुरू होता. या प्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी या ऑफिस बॉयवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
रायगडमध्येही घडला होता संतापजनक प्रकार
तत्पूर्वी, काही दिवसांपूर्वी रायगडमध्येही खासगी कोंचिग क्लासच्या शिक्षकाने इयत्ता दहावीच्या मुलावर अत्याचार केला होता. त्यानंतर त्याच्याविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. संतापजनक प्रकारानंतर मुलाच्या पालकांनी नराधम शिक्षकाच्या अटकेची मागणी केली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.