

टँकर वेल्डिंग करताना स्फोट
एक कामगार गंभीर जखमी
सीसीटीव्हीमध्ये सर्व प्रकार कैद झाला
पुण्यात टँकर वेल्डिंग करताना स्फोट झाल्याची घटना घडली आहे. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या माळी मळा परिसरात आज मंगळवारी सकाळी पेट्रोलजन्य टँकरच्या वेल्डिंगचे काम सुरू होते. या टँकरच्या टाकीत असलेल्या गॅसमुळे स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटात भाजल्यामुळे एक कामगार गंभीर जखमी झालाय. या स्फोटातील गंभीर त्याच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या माळी मळा परिसरातील 'भारत वेल्डिंग वर्क्स' या वर्कशॉपमध्ये टँकरच्या दुरुस्तीचे काम सुरू होतं. टँकरचे दुरुस्तीचे काम सुरू असतानाच अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता मोठी होती. त्यामुळे दुकानाच्या पत्र्याचे शेड तुटून पत्रे बाजूला उडून पडले. या घटनेत चांद बाबू हा कामगार गंभीर भाजला झालाय. स्फोटानंतर कर्मचारी शेडखाली अडकला होता.
जखमी झालेल्या कर्मचाऱ्याला बाहेर काढले. त्याला तातडीने रुग्णवाहिका बोलावून पुण्यातील रुग्णालयात उपचारासाठी पाठवलं. स्फोटात टँकरचे मोठे नुकसान झालं आहे. स्फोटाचा काही अंतरावरपर्यंत आवाज ऐकू गेला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं. सुदैवाने या घटनेत कोणताही जीवितहानी झाली नाही.
टँकरचा वापर पेट्रोल आणि डिझेल वाहतुकीसाठी केला जात होता. टाकीत उरलेल्या ज्वलनशील वायूंच्या साठ्यामुळे वेल्डिंगदरम्यान ठिणगी पडून स्फोट झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या स्फोटाचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. स्फोटानंतर अनेक जण सैरावैरा पळू लागले होते. तर काही जण घाबरून सुरक्षित ठिकाणी गेले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे बोलले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.