Pune : पुण्यात टँकरवर आता ऑनलाइन नजर, राज्यभर योजना राबवली जाणार, पाहा नेमका प्लान काय?

Online Water Tanker : पुणे महापालिकेने पाणीटंचाईग्रस्त भागांसाठी ऑनलाइन टँकर व्यवस्थापन प्रणाली सुरू केली आहे. OTP, GPS ट्रॅकिंग, चालकाची अल्कोहोल चाचणी आणि रिअल-टाइम मॉनिटरिंगमुळे पाणीपुरवठा अधिक पारदर्शक, वेळेत आणि भ्रष्टाचारमुक्त होणार आहे.
Online Water Tanker
Online Water TankerSaam
Published On

गिरीश निकम, साम टीव्ही, मुंबई

Pune Introduces Online Water Tanker : पाणीटंचाई असणाऱ्या भागांना पुणे महापालिकेकडून टँकरने पुरवठा केला जातो. पण त्याचा हिशोब ठेवताना अनेक अडचणी येतात. गैरप्रकारही होतात. त्यामुळे ही सेवा पारदर्शकपणे आणि वेळेत, अचूक पार पडावी, यासाठी शहरातील पाषाण टँकर केंद्रासाठी ऑनलाइन प्रणाली विकसित केली आहे. सोसायटीने केलेल्या टँकरच्या नोंदणीपासून ते पाणी मिळेपर्यंतची सर्व प्रक्रिया ऑनलाइन होत आहे. 104 सोसायटी ऑनलाईन प्रणालीला जोडल्या गेल्या आहेत. त्यातून सुमारे 18 हजार घरांना पाणी मिळत आहे. जून 2025 पासून प्रायोगिक तत्त्वावर असे ऑनलाईन पद्धतीने कामकाज सुरु आहे. पाणी पुरवठा करणाऱ्या कंपन्यांचं बिल काढताना म्हणजेच हिशोबाच्या दृष्टीनेही ही ऑनलाइन देखरेख खूप उपयोगाची पडत आहे. भविष्यात संपूर्ण पुणे शहरात या प्रयोगाची अंमलबजावणी करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

टँकर मॅनेजमेंट पोर्टलचे काम कसे?

टँकरने पाणीपुरवठ्याच्या सेवेसाठी एका खासगी कंपनीने सॉफ्टवेअर तयार केले आहे. टँकर मॅनेजमेंट पोर्टलमध्ये सूस, म्हाळुंगे परिसरातील १०४ सोसायट्यांसह पाणीपुरवठा करणारे टँकरचे क्रमांक, महापालिकेचे अधिकारी यांची माहिती आहे. टँकरची मागणी नोंदविल्यानंतर वेळ, टँकर आणि चालकाचा क्रमांक आणि ओटीपीचा मेसेज जातो. सोसायटीमध्ये पाणी दिल्यानंतर चालकाला ओटीपी दिला जातो. त्यानंतर हा व्यवहार पूर्ण होतो. टँकरचालकाने पैशांसाठी अडवणूक केल्यास लगेच कारवाई केली जाते. मुख्य म्हणजे टँकर चालकाची अल्कोहोल टेस्ट घेतली जाते. पाणी देताना चारही दिशेने फोटो घेतले जातात. या पोर्टलवर सोसायटीच्या बोअरच्या पाण्याची गुणवत्ताही तपासून देण्याची सेवा आहे. या सेवेसाठी सोसायट्यांकडून नाममात्र शुल्क आकारलं जातं.

सूस, म्हाळुंगे भागात टँकरसाठी प्रायोगिक तत्त्वावर ऑनलाइन प्रणाली राबविली आहे. त्यातून फायदा झाला आहे. ही प्रणाली संपूर्ण शहरात राबविली जाऊ शकते, तसेच त्यापूर्वी तांत्रिक बाबींचा अभ्यास करावा लागणार आहे.
नंदकिशोर जगताप, अभियंता, पाणीपुरवठा विभाग, पुणे मनपा
Online Water Tanker
Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदासाठी साकडं, वाढदिवसाला कार्यकर्त्यांनी केली 'लाडूतुला'

पुण्यात दररोज 1,750 टँकरने पाणीपुरवठा

सूस, म्हाळुंगे भागातील नागरिकांनी पाणीटंचाईच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. महापालिका या भागाला जलवाहिनीतून पाणी देऊ शकत नाही. तर त्यांनी टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा, असे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार पाषाण येथे टँकर भरणा केंद्र सुरू करण्यात आले. पुणे मनपाकडून संपूर्ण शहरात दररोज 1,750 टँकरने पाणीपुरवठा होतो. म्हणजेच महिन्याला 50 हजार आणि वर्षाला सहा लाख टँकरने पाणी पुरवठा होतो.

आम्हाला मनपाने टँकर देण्याचे दिवस ठरवून दिले आहेत. ऑनलाईन प्रणालीमुळे टँकर कधी येणार याची माहिती मिळते. पूर्वी अशी माहिती मिळत नसल्याने त्रास होत होता. पण आता चांगली सुविधा मिळत आहे.
आकाश पाटील किरण समृद्धी सोसायटी, सूस

जिल्हाधिकाऱ्यांची सुचना

विशेष म्हणजे पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनीही टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी या ओटीपी आधारीत सॉफ्टवेअर प्रणालीचा अवलंब करण्याबाबत सूचना केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात एप्रिलमध्ये एका बैठकीत टँकरद्वारे पाणीपुरवठा व्यवस्थापन अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने सॉफ्टवेअर प्रणालीचे सादरीकरण करण्यात आले होते. या प्रणालीचा वापर केल्यास टँकरचे जीपीएस ट्रँकिंग, टँकरची स्थिती, निघण्याचे आणि पोहचण्याचे ठिकाण, ड्रायव्हरची शारीरिक तपासणी (अल्कोहोल चाचणी) आदी बाबींचे प्रभावी मॉनिटरींग करणे सुलभ होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पुणे जिल्हातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना टँकरसाठी या प्रणालीचा अवलंब करण्याची सूचना एका पत्राद्वारे केली आहे. पुणे मनपासह पिंपरी-चिंचवड मनपा, पीएमआरडीए आयुक्त, जिल्हा परीषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना हे पत्र पाठवण्यात आले आहे. मात्र अजून तरी पुणे मनपा वगळता इतर स्थानिक स्वराज्य संस्थांनी याचा वापर सुरु केला नाही. टँकर लॉबीचा, पाणी माफियांचा दबाव झुगारुन प्रशासनाने पारदर्शक कारभारासाठी ओटीपी आधारीत ऑलनाईन प्रणाली वापरणे गरजेचे आहे. केवळ पुणेच नाही तर राज्यात इतरही शहरात ही ऑनलाईन प्रणाली वापरणे आवश्यक असल्याचं सुज्ञ नागरीक आणि सामाजीक संस्थांचे म्हणणे आहे. यातून पाणी पुरवठ्याच्या साखळीतील गैरप्रकार रोखणे आणि लोकांना वेळेत चांगली सेवा मिळणे शक्य होणार आहे. टँकर माफियांच्या भ्रष्टाचाराला आळा बसण्यास ऑनलाईन प्रणालीची मदत होणार आहे.

नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनीही उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांतील प्रशासनाला टँकरसाठी सदरची ऑनलाईन प्रणाली वापरण्याची लेखी सुचना केली आहे.

Online Water Tanker
Maharashtra Politics : मोठी बातमी! महाराष्ट्रातील ६४ नगरसेवकांवर कारवाई; ३ वर्षांसाठी अपात्र, कारण काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com