केतन हत्याकांडात हादरवणारा खुलासा, सिया-चेतनने आधीच केलं होतं लग्न; पोलिसांच्या हाती लागले महत्त्वाचे पुरावे

Ketan Agarwal Death case : पुण्यातील लोहगड हत्याकांडात मोठा खुलासा झाला आहे. पोलिसांच्या तपासात सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी चार महिन्यांपूर्वीच गुप्तपणे लग्न केल्याचे व्हॉट्सअॅप चॅटमधून समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे.
Ketan Agarwal Case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी अपडेट,
KETAN AGRAWAL Casesaam tv
Published On

Pune Lohagad Ketan Agarwal Death case : पुण्यातील लोहगड किल्ला (Lonavala) हत्याप्रकरणात आता एक अत्यंत धक्कादायक खुलासा समोर आला आहे. केतन अग्रवाल हत्याप्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांनी चार महिन्यांपूर्वीच गुपचूप लग्न उरकल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांच्या व्हॉट्सॲप चॅटवरून हा खळबळजनक दावा करण्यात आला आहे.

व्हॉट्सॲप चॅटने उघड केलं गुपित

१८ जून रोजी लोहगडावरून ढकलून केतन अग्रवालची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांना पोलिसांनी आधीच अटक केली आहे. तपासादरम्यान पोलिसांनी या दोघांचे मोबाईल फोन जप्त केले होते. या फोनमधील व्हॉट्सॲप चॅटची कसून चौकशी केली असता, दोघांनी चार महिन्यांपूर्वीच विवाह बंधनात अडकल्याचे समोर आले आहे. यामुळे या हत्येचा कट किती आधीपासून आणि कोणत्या उद्देशाने रचला गेला होता, यावर आता चर्चा सुरू झाली आहे.

Ketan Agarwal Case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी अपडेट,
Pune : पुण्यातील केतन अग्रवाल हत्याप्रकरणात मोठी अपडेट; सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडच्या फोन कॉल्सने फोडलं बिंग
Ketan Agarwal Case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी अपडेट,
गुगलवर हत्येचे पर्याय शोधले, लोहगडवरून ढकलण्याचा सराव केला; केतन अग्रवाल खून प्रकरणाचा थरारक उलगडा

प्रेम, लग्न अन् घातपात

मृत केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांचा विवाह ठरला होता. मात्र, सियाचे आधीपासूनच चेतन चौधरीसोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधांना आणि आधीच झालेल्या गुप्त लग्नाला लपवण्यासाठी तसेच केतनला वाटेतून हटवण्यासाठी हा कट रचण्यात आल्याचा संशय आहे. १८ जून रोजी केतनला लोहगडावर फिरवण्याच्या बहाण्याने नेण्यात आले आणि तिथून खाली ढकलून त्याची हत्या करण्यात आली.

Ketan Agarwal Case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी अपडेट,
केतन अग्रवाल हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट! सिया गोयलचं वकीलपत्र कोणाकडे? कोर्टात दोन वकिलांमध्ये गोंधळ

दोन्ही आरोपी न्यायालयीन कोठडीत

या गुन्ह्याचा पर्दाफाश केल्यानंतर पोलिसांनी सिया आणि चेतन या दोघांना बेड्या ठोकल्या होत्या. सध्या हे दोन्ही आरोपी १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत (Judiciary Custody) आहेत. पोलिसांच्या हाती लागलेल्या या नवीन व्हॉट्सॲप पुराव्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेत आरोपींच्या अडचणी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. या गुप्त लग्नाच्या खुलाशानंतर पोलीस आता या प्रकरणाचा पुढील तपास अधिक वेगाने करत आहेत.

Ketan Agarwal Case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी अपडेट,
लोहगड हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, सिया-चेतनचं प्रेम, खुनानंतर ब्लेम गेम, केतनला टक्कल, नात्यात दुराव्याचं कारण?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com