मोठी बातमी! पुण्यात जमावबंदीनंतर रात्री १० नंतर खाद्यपदार्थ विक्री अन् पानटपऱ्या बंद

Pune news : पुण्यात जमावबंदीनंतर रात्री १० नंतर खाद्यपदार्थ विक्री आणि पानटपऱ्या बंद करण्यात येणार आहेत. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी निर्णय घेण्यात आलाय.
pune latest news
pune news Saam tv
Published On

पुणे शहरात १४ दिवसांसाठी जमावबंदी

रात्री दहानंतर हॉकर्स, टपरीचालकांवर निर्बंध असणार

सारसबाग आणि नदीपात्रासह इतर चौपाट्यांवरीलही खाद्यपदार्थ विक्री रात्री दहानंतर बंद

पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. पुणे शहरात 14 दिवसांसाठी जमावबंदी जाहीर करण्यात आली आहे. या जमावबंदीनंतर आता शहरात रात्री १० वाजल्यानंतर खाद्यपदार्थ विक्रेते, हॉकर्स, गाड्या आणि पानटपऱ्या बंद राहणार आहेत. शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी निर्णय घेण्यात आल्याचे पुणे पोलिसांनी सांगितले आहे.

पुण्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेते, हॉकर्स, गाड्या आणि पानटपऱ्या रात्री १० वाजल्यानंतर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार, सारसबाग आणि नदीपात्रासह चौपाट्यांवरीलही खाद्यपदार्थ विक्री बंद केली जाणार आहे.

pune latest news
धाडसी आजीचा पराक्रम! बिबट्याला घरात कोंडून नातवाचा जीव वाचवला

पुणे शहारात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आलं आहे. शहरात रात्रीच्या वेळी टपऱ्या आणि खाद्यपदार्थ्यांच्या गाड्यांवर गर्दी पाहायला मिळते. त्यामुळे अनेक वाद होतात. तसेच रात्री दहानंतर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांची दादागिरी पाहायला मिळते. या पार्श्वभूमीवर शहरात रात्रीची नाकाबंदी आणि पोलिसांची गस्त देखील वाढवण्यात आलीये.

पोलिसांच्या या निर्णयामुळे रात्रीच्या वेळी व्यवसाय करणाऱ्या छोट्या विक्रेत्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे. शहरात रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या स्टॉल्स आणि हॉकर्समुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, असं पोलिसांचं म्हणणं आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर रात्रीच्या वेळी येणाऱ्या-जाणाऱ्या संशयास्पद वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. शहरातील महत्वाचे चौक आणि गुन्हेगारीच्या प्रवृत्तीच्या लोकांचे अड्डे आहेत. या भागात पोलिसांनी गस्त वाढवली आहे.

pune latest news
पहाटे अपघात! चालकाला झोप लागली अन् कार-टेम्पोची जोरदार धडक, एकाचा जागीच मृत्यू

'शहरात रस्ते आणि चौपाटी भागात खाद्यपदार्थ विक्रेते, हॉकर्स, पानटपरी चालकांची दुकाने रात्री दहा वाजल्यानंतर बंद करण्याचा निर्णय घेतलाय. तर हॉटेल, बार यांना मध्यरात्री दीडपर्यंत नियमानुसार परवानगी देण्यात आली आहे. ती आधीसारखी सुरू राहतील. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्स, बार आणि पब चालकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पुणे शहर आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com