Pune : भाविकांनो गणेशोत्सवात काळजी घ्या, 'या' आजारांमुळं आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर, आरोग्य विभागानं केलं मोठं आवाहन

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या (PMC) आरोग्य (Health) विभागाने इन्फ्लूएंझा सारख्या आजाराने ग्रस्त नागरिकांना (ताप, सर्दी आणि खोकला यांसारखी लक्षणे) घरी राहण्याचे आवाहन केले आहे.
pune news
pune news saam tv
Published On

पुणे : यंदाच्या वर्षी गणेशोत्सव सुरू होण्याआधीच सर्वच ठिकाणी धामधूम पाहायला मिळत आहे.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ देखील गजबजली आहे. यावर्षी कोरोना निर्बंध शिथिल केल्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी लोकांमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह वाढल्याचा दिसत आहे. त्यामुळे पुण्यासहित राज्यातील अनेक शहरात मोठ्या प्रमाणात गणेशभक्तांची गर्दी पाहायला मिळणार आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या (PMC) आरोग्य (Health) विभागाने इन्फ्लूएंझा सारख्या आजाराने ग्रस्त नागरिकांना (ताप, सर्दी आणि खोकला यांसारखी लक्षणे) घरी राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच या रुग्णांना पुरेशी विश्रांती घेण्याचेही आवाहन केले आहे. (Pune News In Marathi)

pune news
Eknath Shinde : पोलीस, अग्निवीर तरुणांसाठी आनंदाची बातमी; शिंदे सरकारने घेतला मोठा निर्णय

'पुण्यासहित राज्यात देखील कोरोना विषयक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. सरकारनेही कोणतेही मार्गदर्शक तत्वे जारी केले नाहीत. पुण्यात आम्हाला गेल्या दहा दिवसांपासून कोरोनाची दररोज २०० रुग्ण आढळून येत आहेत. इतर कोणत्याही साथीच्या आजाराने ग्रस्त असाल किंवा लक्षणे असणाऱ्यांनी घरीच राहणे शहाणपणाचे ठरेल, असे पुणे महानगरपालिकेचे सहायक वैद्यकीय प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले.

दरम्यान, पुण्यात आतापर्यंत १४.९६ लाख कोरोना रुग्णांची नोंद झाली असून १९,७३९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुणे शहरात कोरोनाचे ६.८ लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. तर पिंपरी-चिंचवडमध्ये ३.६ लाख रुग्ण आढळले आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारींनी सांगितल्यानुसार, जिल्ह्यात दररोज २५०० जणांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. तर त्यातील २५०-२७० जणांना कोरोना झाल्याचे आढळून येत आहे.

pune news
गुलाबराव पाटलांचे स्त्री रोगतज्ज्ञांबाबत वादग्रस्त वक्तव्य; चंद्रकांत पाटील म्हणाले...

दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डॉ. संजय पुजारी यांनी सांगितले की, लोकांना आमचे आवाहन आहे असेल की, मास्क परिधान करावा. विशेष म्हणजे गर्दीच्या ठिकाणी आठवणीने मास्क परिधान करावा. कोरोना विषाणू हा हवेतून पसरतो आणि त्याचे थेंब हवेत जास्त काळ थांबू शकतात'.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com