Chandrakant patil News : मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावातील काल एका कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ' स्त्रीरोग तज्ज्ञ हे कधीच हातपाय बघत नाही. हातपाय बघणारे कधीच स्त्री रोगतज्ज्ञ होऊ शकत नाही, असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावमधील एका कार्यक्रमामध्ये केलेले आहे. गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यावर मंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर त्यांनी प्रतिक्रिया देणं टाळले. 'मी त्यांचे वक्तव्य पाहिले नाही. त्यामुळे मी त्यावर बोलणे योग्य नाही, असे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले.
मंत्री चंद्रकांत पाटील एका कार्यक्रमानिमित्त एका विद्यापीठात आले होते. विद्यापीठात आल्यावर मात्र चंद्रकांत पाटील यांनी राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया देणे टाळले. कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील गोकुळ दूध संघातील सत्तांतरानंतर आज पहिलीच सर्वसाधारण सभा झाली. या सभेत महाडिक – पाटील गटाच्या सभासदांनी प्रचंड घोषणाबाजी केल्याने गोंधळ निर्माण झाला. या गोंधळावरही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देणे काहीसे टाळले. 'मी या विषयावर बोलण्याचं कारण नाही. जी गोकूळमध्ये संचालक आहेत, ते या विषयावर बोलतील, असे ते म्हणाले.
सोलापूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांची स्कॉलरशीप थकली आहे. यावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, 'मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नवा प्रस्ताव मांडला आहे. केंद्राच्या शिष्यवृत्तीतील काही भाग राज्याने द्यायचा असतो. ती रक्कम देखील द्यायची राहते. त्यामुळे त्या त्या कॉलेजची मोठी ओढाताण होते. त्यामुळे मी असा प्रस्ताव मांडलाय की, सरकारने ज्या कॉलेजचे जेवढे देणे द्यायचे आहे, त्या कॉलेजला त्याची तेवढं सरकार गॅरंटी द्यायचं. त्या सरकारच्या गॅरंटीवर कर्ज घ्यायचं, त्याचं व्याज सरकार भरणार. जेव्हा सरकार पैसै देईल, त्यावेळी ते अकाउंट क्लोज होऊन जाईल.
'स्कॉलरशीप रक्कम कॉलेजला मिळाली नाही तर विद्यार्थ्यांचे मार्कलिस्ट अडवून ठेव्याचा कोणालाही अधिकार नाही. तसे जर कुठे होत असेल तर त्यावर मी कारवाई करेल', असेही ते म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.