Eknath Shinde : पोलीस, अग्निवीर तरुणांसाठी आनंदाची बातमी; शिंदे सरकारने घेतला मोठा निर्णय

अग्निवीर भरतीसाठी येणाऱ्या तरुणासाठी शिंदे सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSaam TV
Published On

मुंबई : राज्यातील शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकारने पोलीस, अग्निवीर भरतीसाठी येणाऱ्या तरुणासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. पोलीस,अग्निवीर भरतीसाठी येणाऱ्या तरूणांची राहण्याची, नाश्त्याची सोय जिल्हा प्रशासनामार्फत करावी व त्याठिकाणी आवश्यक आरोग्य सुविधा पुरविण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. यासंदर्भात आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले होते. (Eknath Shinde News Today)

Eknath Shinde
Lalbaug Cha Raja 2022 : लालबागचा राजाची पहिली झलक; मुखदर्शनासाठी भाविकांची गर्दी; पाहा VIDEO

देशसेवा करण्याच्या दृष्टीने पोलीस व अग्निवीर या सेवेत भरतीसाठी युवा वर्ग उत्साहाने सहभागी होतात. त्यातील अनेक तरूण सर्वसामान्य गरीब कुटुंबातील असतात. लांब अंतरावरून भरतीसाठी हे तरूण येतात. त्यांची त्याठिकाणी गैरसोय होऊ नये, याकरिता ज्या जिल्ह्यांमध्ये अशी भरती चाचणी होईल तेथील जिल्हा प्रशासनामार्फत जिल्हा परिषद किंवा महापालिका शाळांमध्ये या तरुणांची राहण्याची सोय करतानाच नाश्ता, आरोग्य सुविधा देण्यात याव्यात, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (Eknath Shinde Todays News)

Eknath Shinde
Snake Video : महिला गाढ झोपेत, अंगावर फणा काढून बसला कोब्रा; पुढे काय झालं?, पाहा VIDEO

अग्निवीर भरतीसाठी चाचणीदरम्यान, धावणाऱ्या २१ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर भरतीसाठी येणाऱ्या तरूणांना शासनाकडून सुविधा मिळण्याबाबतची मागणी पत्राद्वारे करण्यात आली होती. त्याची तातडीने दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी तरूणांची गैरसोय होणार नाही यासाठी जिल्हा प्रशासनाने दक्षता घ्यावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यानी दिल्या.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com