Pune New Superfast Express: पुण्यातून धावणार २ नव्या सुपरफास्ट ट्रेन, कोण कोणते थांबे? कुठे पोहोचणार?

2 New Superfast Expres Train: आता पुण्याला जोडणाऱ्या दोन नवीन सुपरफास्ट एक्सप्रेस सुरु होणार आहेत. या एक्सप्रेसमुळे महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश राज्य जोडले जाणार आहे.
Pune New Superfast Express
Pune New Superfast ExpressSaam Tv
Published On

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता रेल्वेने दोन सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेनला परवानगी दिली आहे. या सुपरफास्ट एक्सप्रेस पुण्याला जोडल्या जाणार आहे. त्यामुळे पुण्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खूप फायदा होणार आहे. या सुपरफास्ट एक्सप्रेस पुणे, गोंदिया, रेवा, जबलपूर, रायपूरशी जोडल्या जाणार आहेत.रेवा ते पुणे आणि जबलपूर- रायपूर या नवीन एक्सप्रेस ट्रेन असणार आहे. (New Superfast Express Train)

Pune New Superfast Express
Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनबाबत महत्वाची अपडेट; ट्रायल झाली सुरु, प्रवास कधी करता येणार?

या दोन सुपरफास्ट एक्सप्रेसमुळे महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडचा प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होणार आहे.ही नवीन रेल्वो सेवा पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील प्रवाशांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

यातील एक सुपरफास्ट एक्सप्रेस रेवा-गोंदिया-पुणे या मार्गावर धावेल. तर दुसरी एक्सप्रेस जबलपूर-रायपूर या मार्गावर धावेल. रेल्वे कनेक्टिव्हिटीचा पाठपुरवठा केल्यानंतर या एक्सप्रेस ट्रेनला मंजुरी देण्यात आली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या दोन सुपरफास्ट एक्सप्रेस सुरु करण्याची घोषणा केली आहे.

नवीन एक्सप्रेसचे रेल्वे मार्ग (New Superfast Express Route)

  • रेवा-पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस रेवा-सतना-जबलपूर-नैनपूर-बालाघाट-गोंदिया-नागपूर-पुणे या मार्गाने प्रवास करेल.

  • जबलपूर-रायपूर सुपरफास्ट एक्सप्रेस जबलपूर-नैनपूर-बालाघाट-गोंदिया-रायपूर या मार्गाने धावणार आहे.

Pune New Superfast Express
Vande Bharat First Sleeper Trains: मुंबईतून धावणार पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन, कसा असेल मार्ग? जाणून घ्या

या दोन नवीन एक्सप्रेस ट्रेनमुळे प्रवासाचा वेळ खूप कमी होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील आणि विदर्भातील प्रवाशांना फायदा होणार आहे. तसेच महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांना एकमेकांना जोडण्यात येईल. यामुळे गोंदिया, नागपूर, पुण्यातील प्रवाशांना फायदा होणार आहे.

Pune New Superfast Express
Central Railway: प्रवाशी मित्रांनो लक्ष द्या! लोकल रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं; २० मिनिटे उशिराने मध्य रेल्वेची वाहतूक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com