तीनवेळा चाकू खुपसला, शांत डोक्याने पत्नीच्या मृतदेहाचे तुकडे बॅगेत भरले; बेंगळुरुच्या फ्लॅटमध्ये काय घडलं?

Pune Gauri Murder Case Body Pieces in Suitcase : कर्नाटक राज्यातील बेंगळुरूच्या हुलीमावू भागात ही भयंकर घटना घडली आहे. महाराष्ट्रातील राकेश खेडकर नावाच्या व्यक्तीने पत्नी गौरी सांबेकर हिचा खून केला.
Pune Gauri Sambekar was Killed by her husband
Pune Gauri Sambekar was Killed by her husband Saam Tv News
Published On

पुणे : गेल्या काही दिवसांपासून हत्येच्या थरारक घटना समोर येत आहेत. वैवाहिक जीवनात आपल्या पार्टनरसोबत होत असलेल्या भांडणातून मोठ्या प्रमाणात हत्याकांडाच्या घटना समोर येत आहेत. मेरठच्या सौरभ राजपूतची निर्घृण हत्या, उत्तर प्रदेशमध्ये पैशांसाठी नवविवाहितेनं आपल्याच नवऱ्याला सुपारी देऊन संपवलं. त्यानंतर अशीच एक धक्कादायक घटनो समोर आली आहे. आता बेंगळुरूमध्येही आणखी एका हत्याकांडाची घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या केलीय. तिच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि ते एका सुटकेसमध्ये भरले. पत्नीच्या हत्येनंतर सासरच्या लोकांनाही त्याने फोनवरुन सगळी माहिती दिल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणातील आरोपीला पतीला साताऱ्यातून ताब्यात घेण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राकेश खेडेकर आणि गौरी सांबेकर यांचं दोन वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. एक-दोन महिन्यापूर्वीच दोघेही बेंगळुरू येथे शिफ्ट झाले होते. दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी बेंगळुरू पोलिसांनी देखील यामध्ये मध्यस्थी करत दोघांची समजूत घातली होती. मात्र दोन दिवसांपूर्वी दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद झाले. हा वाद टोकाला पोहोचला. संतापलेल्या राकेश खेडकरने पत्नी गौरीवर चाकूने वार करत तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून सुटकेसमध्ये भरले. याची माहिती त्याने मुंबई जोगेश्वरी येथे राहत असलेल्या आपल्या कुटुंबातील लोकांना देखील दिली होती. त्यानंतर तो स्वतःच्या खासगी वाहनाने बेंगळुरूवरून जोगेश्वरीला येत होता. जोगेश्वरीला जात असतानाच त्याने रस्त्यात झुरळ मारण्याचे औषध आणि फिनायल प्राशन केले, त्यामुळे तो शिरवळ शिवारात बेशुद्ध झाला.

Pune Gauri Sambekar was Killed by her husband
Crime : खेडकरने बायकोचे तुकडे केले अन् सुटकेसमध्ये भरले, एका चुकीनं झाला भंडाफोड, पुण्यात बेड्या

फ्लॅटमध्ये नेमकं काय घडलं?

कर्नाटक राज्यातील बेंगळुरूच्या हुलीमावू भागात ही भयंकर घटना घडली आहे. महाराष्ट्रातील राकेश खेडकर नावाच्या व्यक्तीने पत्नी गौरी सांबेकर हिचा खून केला. हत्येनंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे सुटकेसमध्ये भरले. यानंतर त्याने सासू सासऱ्यांना फोन करून माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता घरात त्यांना एक सुटकेस सापडली. पोलिसांना सुटकेसमध्ये गौरीचा मृतदेह आढळून आला.

राकेश आणि गौरी दोघेही एका खासगी कंपनीत कामाला असून सध्या त्यांचं घरुन काम सुरु होतं. त्यांच्यामध्ये सतत वाद होत होते. हे भांडण इतकं वाढलं आणि विकोपाला जायचं की, त्यांच्या शेजाऱ्यांनाही त्याचा त्रास होत होता. दोघांमधल्या भांडणाचा राकेशच्या मनात प्रचंड संताप निर्माण झाला होता. हत्येआधीही दोघांमध्ये जोरदार भांडण झालं होतं. वाद इतका वाढला की त्याने रागाच्या भरात गौरीच्या पोटात वार केले. त्यानंतर गळा चिरून तिची हत्या केली. हत्येनंतर राकेशने गौरीचा मृतदेहाचे तुकडे केले आणि एका मोठ्या ट्रॅव्हल सुटकेसमध्ये भरला आणि बाथरूममध्ये टाकून पळ काढला.

Pune Gauri Sambekar was Killed by her husband
Baramati News : बारामतीवर डोळा, शिंदेसेनेला हवाय अजितदादांचा बालेकिल्ला, आमदाराचा शिवतारेंना सल्ला, म्हणाले...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com