Baramati News : बारामतीवर डोळा, शिंदेसेनेला हवाय अजितदादांचा बालेकिल्ला, आमदाराचा शिवतारेंना सल्ला, म्हणाले...

Baramati Shivsena Meeting : शिवसेनेने आता मिशन बारामती हाती घेतलं आहे. त्याअंतर्गत शिवसेनेकडून संवाद बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी माजी मंत्री विजय शिवतारे यांना सल्ला दिला आहे.
Baramati Shivsena party meeting MLA Sharad Sonawane advice to Vijay Shivtare
Baramati Shivsena party meeting MLA Sharad Sonawane advice to Vijay ShivtareSaam Tv News
Published On

अक्षय बडवे, साम टीव्ही

पुणे (बारामती) : शिंदेंच्या शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. विशेषतः शिवसेनेकडून पक्षवाढीसाठी आक्रमक पावले टाकली जात आहेत. एकीकडे उद्वव ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा आपण कायम पुढे राहण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न दिसत आहे. दुसरीकडे अजितदादांनीही पक्षाचा विस्तार कसा होईल यावर लक्ष केंद्रित केलं आहे. मात्र, त्याच अजित पवारांच्या बारामती लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेनं आपली पकड मजबूत केलीय. बारामती विधानसभा मतदारसंघातील सहाही मतदारसंघात शिवसेनेचा आमदार असावा, अशी अपेक्षा शिंदेसेनेचे तथा जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी सेनेच्या एका मेळाव्यातून व्यक्त केली आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून पक्षवाढीसाठी विभागानुसार बैठका घेतल्या जात आहेत. माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला रामराम करत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. पुणे शहरातील ताकद वाढवल्यानंतर आता शिंदे सेनेनं आपला मोर्चा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बालेकिल्ल्याकडे म्हणजे बारामतीकडे वळवला आहे.

Baramati Shivsena party meeting MLA Sharad Sonawane advice to Vijay Shivtare
Prashant koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरवर वकिलाचा हल्ला; कोर्टाबाहेरील थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

शिवसेनेने आता मिशन बारामती हाती घेतलं आहे. त्याअंतर्गत शिवसेनेकडून संवाद बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी माजी मंत्री विजय शिवतारे यांना सल्ला दिला आहे. कार्यकर्त्यांना चार्ज करण्यासाठी सोनवणे यांनी शिरूर लोकसभेसंदर्भातही मोठं भाष्य केलं आहे. आमदार शरद सोनवणे म्हणाले की, बारामती लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात आपलेच आमदार असायला हवेत. बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सर्व सहाही मतदारसंघात विजय बापू शिवतारे यांनी आपले आमदार निवडणून आणले पाहिजेत, कारण राजकारणात काहीही होऊ शकतं.

उद्या म्हणाले, तुमच्या ताकतीवर लढा, तर आपली तयारी असायला हवी. आपली स्वतःची ताकद भरभक्कम हवी. शिवसेना पक्ष नेतृत्वानं आदेश दिला आणि उद्याची शिरूर लोकसभेची निवडणूक जिंकायचे आदेश दिले, तर शिरूर लोकसभेची ती जागा शंभर टक्के जिंकणारच. इतकंच नाही तर शिरूर लोकसभा मतदार संघातील सहाही आमदार निवडून आणणार, असा दावा शरद सोनवणे यांनी केला आहे.

Baramati Shivsena party meeting MLA Sharad Sonawane advice to Vijay Shivtare
Greater Noida Hostel Fire: नोएडा येथील मुलींच्या वसतिगृहाला भीषण आग, मुलींनी पाचव्या मजल्यावरून मारल्या उड्या, VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com